शहादा प्रतिनिधी: अश्विन सोनवणे
मागील काही महिन्यांपासून कोरोनाने पुर्ण जगाला वेठीस धरले आहे. आपलं शहादा सुद्धा याला अपवाद नाही. काही दिवस आधीच प्रशासनाने बस फेऱ्या चालु केल्याने शहादा आगारातुन सुद्धा काही लांब पल्ल्याच्या बस फेऱ्या चालु झालेल्या आहेत. म्हणून प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन दि.०४/०९/२०२० रोजी कै. कलावती पाडवी फॉउंडेशन सोमावल बु. तर्फे तसेच आमदार राजेश दादा पाडवी यांच्या मार्गदर्शनाने शहादा बस आगाराला स्प्रे पंप आणि २० लिटर सॅनिटाईझर भेट देण्यात आले.* भाजपा कामगार आघाडी शहादा तालुका अध्यक्ष श्री. नितिनभाऊ कोळी यांच्यामार्फत शहादा आगार व्यवस्थापक श्री. योगेश लिंगायत साहेब यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी स्थानक प्रमुख आर.आर. वाघ ,विलास पाटील साहेब, डी.एम.वाघ साहेब, मिर्झा साहेब. आर.एन. कुवर, आर.डी. पानपाटील, विजय धनगर, शरीफ पिंजारी, सुनिल सप्रे उपस्थित होते..
Tags
news
