*मुंबई:*
_राज्यात गेल्या २४ तासांत कोरोना संसर्गाचे तब्बल २३ हजार ३५० नवे रुग्ण आढळले असून, कालचा उच्चांक मागे पडून आज नवा उच्चांक नोंदवला गेला आहे. दिवसभरात कोरोनाने आणखी ३२८ जणांचा बळी घेतला असून, मृत्यूचे हे प्रमाण सरकार आणि आरोग्य यंत्रणेसाठी चिंता वाढवणारं ठरलं आहे._
_महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा ग्राफ चढताच आहे. आरोग्य यंत्रणा करोना साथ नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना राबवत असतानाच राज्यात अनेक निर्बंध शिथील झाल्याने त्याचा मोठा परिणाम कोरोनाच्या आकडेवारीवर दिसून येत आहे. राज्यात शनिवारी २० हजारावर नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाल्यानंतर आज तो आकडाही मागे पडला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात घेण्यात आलेल्या चाचण्यांमधून २३ हजार ३५० रुग्णांचा अहवाल कोरोनासाठी पॉझिटिव्ह आला आहे. हा आकडा सर्वांच्याच पोटात भीतीचा गोळा आणणारा ठरला आहे._
Tags
news

