शहादा (प्रतीनिधी) :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्ताने भोरटेक (ता. शहादा) येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यात व जिल्ह्यात हा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून भाजपच्यावतीने सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शहादा तालुक्यात भाजपच्यावतीने यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. असून या सेवा सप्ताहात विविध कल्याणकारी कार्यक्रमांचे आयोजन भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहेत यानिमित्ताने जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागातील पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह संचारला असून या सेवा सप्ताहात जिल्ह्यातील तळागाळातील भाजपचे कार्यकर्ता कार्यक्रम घेण्यासाठी चढाओढ करतांना दिसून येत आहेत.
भोरटेक (ता. शहादा) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. त्यात वृक्षरोपण व आर्सेनिक अल्बम-३० च्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम ग्रामपंचायत व जि. प. शाळेच्या प्रांगणात करण्यात आला. त्यावेळी आमदार पाडवी यांनी गावकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. शेतकरी बांधवांना शेतशिवाराचा अडीच किलोमीटरचा रस्तावर पावसाळ्या खूप मोठी कसरत करावी लागते. पावसाळ्याच्या दिवसात शेतात ट्रॅक्टर , बैलगाडी व मोटारसायकल यांपैकी कोणतेही वाहन त्याठिकाणी जाऊ शकत नाही. त्या रस्त्याचे लवकरात लवकर काम व्हावे अशी मागणी त्यावेळी ग्रामस्थांनी केली. व सोबतच युवा मंडळींनी गावात महाराणा प्रताप यांचा स्तंभ उभारणीसाठी निवेदन सादर केले, तर भोरटेक गावात पक्की जिम बांधकाम झाले असून अघ्यापी त्यात साहित्य उपलब्ध नाही आहे त्याची देखील मागणी केली. या सर्व समस्या आमदार पाडवी यांनी जाणून घेतल्या व बऱ्याच समस्यांचे निराकरण त्यांनी त्याचवेळी केले.
त्यावेळी आमदार पाडवी म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण भारतभरात आणि राज्यभरात सेवा सप्ताह सुरु केला आहे. जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर विविध कार्यक्रम १४ ते २० तारखेपर्यंत विविध गावांमध्ये व शहरामध्ये मोर्चा, आघाडी, महिला आघाडी, युवा मोर्चा, शिक्षक आघाडी, कामगार आघाडी, तालुका अध्यक्ष यांच्या मार्फतीने दिव्यांगांना भेट वस्तू, रुग्णांना फळ वाटप, गोरगरिबांना वस्त्र वाटप, विधवा महिलांना साड्या वाटप, रक्तदान शिबीर, चष्मे वाटप, वृक्षारोपण कार्यक्रम, रोग प्रतिकार शक्ती वाढवणारे आर्सेनिक अल्बम-३० गोळ्या वाटप, फेस मास्क वाटप इत्यादी कार्यक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह म्हणून साजरा करून कार्यक्रम राबवित आहेत. त्याचबरोबर शहादा तालुका महिला मोर्चा अध्यक्ष प्रतिभा पवार यांनी महिलांसाठी केंद्रसारकारच्या ज्या योजना आहेत त्या सर्व योजना महिलांना अवघत कराव्यात व सर्व योजना राबवाव्यात असे त्यांनी कार्यक्रमा दरम्यान बोलताना सांगितले.
यावेळी शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र जमदाळे, जिल्हा मोर्चा आघाडी अध्यक्ष विनोद जैन, शहादा तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा किन्नरी सोनार, जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्षा नंदाताई सोनवणे, शहादा शहर उपाध्यक्षा पंकज सोनार, शहादा तालुका युवा मोर्चा उपध्यक्ष दिलवरसिंग गिरासे, महामंत्री हितेंद्र वर्मा, शहादा शहर सरचिटणीस वैभव सोनार, जिल्हा महिला मोर्चा प्रसिद्धी प्रमुख भावना लोहार, जिल्हा आदिवासी मोर्चा अध्यक्ष लक्ष्मीकांत वसावे, जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस सचिन देवरे, शहादा महिला मोर्चा अध्यक्षा तथा उपसरपंच भोरटेक प्रतिभा पवार, सरपंच भोरटेक मिनाबाई पवार, ग्रामसेविका रुपाली सिसोदिया, भाजपचे सुनील पवार, जयसिंग पवार, पत्रकार कल्पेश राजपूत, विद्या गिरासे, जयश्री जाधव, यशोदा ठाकरे, अर्चना गिरासे, सुलुबाई गिरासे, शीतल गिरासे, गायत्री पवार, जोत्स्ना गिरासे, सरला पवार, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठानसिंग चव्हाण यांनी केले व वृक्षरोपण कार्यक्रमासाठी शिक्षक आघाडी, महिला मोर्चा आघाडी व आदिवासी आघाडी सेलचे सदस्यांनी परिश्रम घेतले.
Tags
news
