थाळनेर - शिरपूर तालुक्यातील थाळनेर गावात मागील काही काळा पासून कोरोना संसर्ग वाढत आहे. त्यावर नियंत्रण करण्यासाठी प्रशासन व स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन सर्व प्रयत्न करत असून विविध उपाय योजना राबविल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून थाळनेर ग्रामपंचायतीकडुन उप केंद्र व आशा कार्यकर्तींना आआँक्सीमीटर व थर्मल गन चे वाटप करण्यात आले. गावातील कोरोनाचावाढता प्रभाव लक्षात घेता काम करणे सोयीचे व्हावे म्हणुन या वस्तुंचे वाटप हे करण्यात आले या प्रसंगी उपसरपंच आशाबाई वामन कोळी पं स सदस्य विजय बागुल सर ग्रामपंचायत सदस्य अनिल आण्णा मराठे शामराव भिल डोंगर भाऊ कोळी ग्रामविकास अधिकारी वेताळे भाऊसाहेब व ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags
news
