नंदुरबार - राज्यात वाचन चळवळ राबवविणाऱ्या 'युवकमित्र परिवार'नंदूरबार या चळवळीमार्फत पुणे शहरात जुने नवे ग्रंथ संकलन मोहीम राबविण्यात येत आहे.दि.१५ ऑक्टोबरपर्यन्त ही मोहीम सुरू राहणार असून नागरिकांनी वाचून झालेले जुने,नवे ग्रंथ दान करावेत असे आवाहन चळवळीचे संस्थापक प्रवीण महाजन यांनी केले आहे.
युवकमित्र परिवार, नंदूरबार मार्फत राज्यातील ग्रामीण भागात वाचनालये स्थापन केली जातात.या वाचनालयांना मोफत ग्रंथ भेट दिले जातात.यासाठी पुणे शहरात 'सेवा सप्ताह,दान सप्ताह,वाचन प्रेरणा दिनाच्या धर्तीवर 'ग्रंथ संकलन मोहीम'राबविण्यात येत आहे.नागरिकांनी दान केलेले जुने/नवे ग्रंथ ग्रामीण,दुर्गम भागातील वाचनालयांना प्रदान केले जाणार आहेत.पुणे शहरातील ग्रंथदान करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी 9529125396 या नंबरवर संपर्क करावा.चळवळीचे स्वयंसेवक स्वतः येऊन ग्रंथ संकलित करतील.असे प्रवीण महाजन यांनी सांगितले.जास्तीत जास्त नागरिकांनी ग्रंथ संकलन मोहिमेत सहभागी नोंदवावा असे आवाहन चळवळीचे कार्यकर्त सागर पाटील,चेतन मराठे, राम जवान, गणेश माळी, मनोज वारुडे यांनी केले आहे.
Tags
news
