नंदुरबार(प्रतिनिधी):-देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70 वाढदिवसानिमित्त संपुर्ण देशभर सेवा सप्ताहाचे आयोजन भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आले असून त्यानिमित्ताने यासेवा सप्ताह कालावधीत विविध जनकल्याणकारी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पक्षाच्यावतीने सर्वत्र सेवा कार्यक्रम जोरात आयोजित करण्यात आले आहेत सातपुड्याच्या दुर्गम भागात देखील विविध सेवा कार्यक्रम होताना दिसून येत आहे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी यांच्या नियोजनाने जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये सेवा सप्ताहाचे कार्यक्रम घेण्याची चढाओढ लागलेली दिसून येत आहे आणि त्यानिमित्ताने एक वेगळाच उत्साह संचारलेला दिसून येत आहे जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या आघाड्या मोर्चे यांच्यात कार्यक्रम करण्याची जणू काही स्पर्धाच सुरू असल्याचे दिसून येत आहे संपूर्ण जिल्हाभरात प्रथमतःअसे कार्यक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या कार्यक्रमात लोककल्याणकारी उपक्रम राबविण्यात येत आहेत त्यात स्वच्छता अभियान, वृक्षारोपण,दिव्यांगांना कृत्रीमावयवांचे वाटप,रुग्णांना फळे वाटप,रक्तदानशिबीर यासारख्या अनेक कार्यक्रमाचे यासेवा सप्ताहात आयोजन करण्यात आले असून आज नंदूरबार भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून 70 रक्तदात्यांनी रक्तदान करण्यात आले होते नंदूरबार भारतीय जनता पक्षाचे जिल्हाअध्यक्ष विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे आज येथील मंगल भुवन कार्यलयात नंदूरबार जिल्हा भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात 70 युवकांनी रक्तदान केले यावेळी
भारतीयजनतापक्षाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी,
निलेश चौधरी जिल्हा सरचिटणीस,संतोष वसईकर,
विनम्र शहा,जिल्हाध्यक्ष अनुसूचित मोर्चा,जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा हर्षल पाटील,शहर सरचिटणीस खुशाल चौधरी,
जिल्हासचिव अश्विन सोनार,
जिल्हा सचिव मयूर चौधरी,
सागर सोनार,किरण वाडीले,
युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते*
Tags
news
