साक्री कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना यांचे कांदा निर्यात धोरणास विरोध



साक्री -  साक्री कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना यांचे कांदा निर्यात धोरणास विरोध दर्शवला असून  निवेदन देऊन याचा निषेध व्यक्त केला आहे .या निर्णयामुळे शेतकर्यांना फार मोठे नुकसान होणार असून  कांदा निर्यात बंदी हा गंभीर विषय असुन याच्या निषेधार्त साक्री तहसील ,तसेच पिंपळनेर येथील अप्पर तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.याप्रसंगी साक्री व पिंपळनेर या दोघी ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.यावेळी साक्री तालुक्याचे अध्यक्ष सौरभ पाटील,,कार्याध्यक्ष जयेश पाटील,उपाध्यक्ष यश सोनवणे तसेच युवती तालुका अध्यक्ष जाग्रुती अहिरे,युवती उपाध्यक्ष कृणाली नांद्रे व नंदुरबार चे विद्यार्थी सेल अध्यक्ष युगंधरा पगारे आदी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने