शिरपूर प्रतिनिधी - दिनांक 20 रोजी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील वनावल जिल्हा परिषद गटातील खर्दे खुर्द, पाथर्डी ,बाबूळदे, गिधाडे ,बाळदे,वनावल ,जातोडा बोरगाव ,साकवद इत्यादी गावात शेतकरी त्यांचे अतोनात नुकसान झाले असून याबाबत तातडीने सरकारी पंचनामे करून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी वनावल गटातील जिल्हा परिषद सदस्य सौ अभिलाशा भरत पाटील व परिसरातील शेतकरी यांनी निवेदन देऊन तहसीलदार शिरपूर यांच्याकडे मागणी केली आहे
या तसे नमूद केले आहे की दिनांक 20 सप्टेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी झाल्यामुळे वणावल गटातील वरील गावांचे शेतकऱ्यांचे ऊस ,कापूस, सोयाबीन,पपई, केळी आणि इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्यात सुरु असलेल्या कोरोनाणाच्या महामारीमुळे या आधीच शेतकरीवर्ग अडचणीत असल्यामुळे आता हातात आलेले पिक देखील नाहिसे झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे .अनेक शेतकऱ्यांनी खाजगी सावकार, बँका आणि इतर वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज घेऊन पिकांची लागवड केलेली होती. मात्र आता अवकाळी पावसामुळे हातातले पिके जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले असून वनावल जिल्हा परिषद गटातील वर नमूद केलेल्या गावांच्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत मिळणे कामी सहकार्य करण्याबाबत या निवेदनात नमूद केले आहे .सदरच्या निवेदनावर जिल्हा परिषद सदस्य सौ अभिलाशा भरत पाटील ,पंचायत समिती सदस्य भरत भिलाजी पाटील ,सुमित पाटील सरपंच खरदे, माजी उपसभापती जगत सिंग राजपूत यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या सह्या आहे
Tags
news
