शिरपूर प्रतिनिधी ,- धुळे स्थानिक गुन्हे शाखा चे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली होती त्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यासाठी एक पथक नियुक्त करून शिरपूर तालुक्यातील मोहिदा तालुका शिरपूर येथे दिनांक 21 रोजी छापा टाकून कारवाई केली असता नानसिंग चमाऱ्याऱ्या पावरा राहणार मोहीदा तालुका शिरपूर यांनीमानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या अमली पदार्थ सदृश्य गांजा हा छोटी विक्री करण्याच्या उद्देशाने लपवून ठेवण्यात होता .सदरच्या कारवाईत आरोपी यांच्या घरातून एकूण 116 किलो गांजा किंमत रुपये 6लाख 38 हजार च्या गांजा मिळून आला सदर इसमास ताब्यात घेऊन शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे आरोपी विरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करणे आला आहे
पोलीस अधीक्षक चिन्मय पंदित अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक पंकज कुमावत ,पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सपोनि उमेश बोरसे ,पोलीस उपनिरीक्षक हनुमान ऊगले, पोलीस हवालदार रफिक पठाण ,श्रीकांत पाटील प्रभाकर बैसाणे, गौतम सपकाळे, कुणाल पाटील, राहुल पाटील, दीपक पाटील, प्रशांत माळे तालुका पोलिस स्टेशनचे सपोनि अभिषेक पाटील पोसई नरेंद्र खैरनार पोलीस शिपाई वारिस पठाण संदीप शिंदे, श्याम सिंग पावरा व चालक राजीव गीते महिला पोलीस शिपाई सुनीता पवार, नायब तहसीलदार चौगुले यांच्या उपस्थितीत या सर्वांच्या पथकाने केली आहे.
Tags
news
