शिरपूर प्रतिनिधी- शिरपूर तालुक्यात बँक मॅनेजर बँक ऑफ बडोदा शाखा दहिवद यांच्या मनमानी कारभार मुळे तालुक्यातील कै .दामू भिका पाटील या शेतकऱ्याने जीव गमावला आहे असा आरोप प्रहार जनशक्ती पक्ष यांनी केला असून याबाबत तहसीलदार शिरपूर यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
सदरच्या निवेदनात आजपर्यंत दिलेल्या संदर्भीय पत्रांच्या उल्लेख असून या शेतकऱ्याचा जीव बँक अधिकाऱ्यांच्या मोगलाई वागणुकीमुळे हृदय विकाराचा झटका येऊन मृत्यू झाला आहे. त्यामुळे या सर्व प्रकारात बँकेचे शाखाधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे .
मयत शेतकरी कै. दामू भिका पाटील हे अल्पभूधारक शेतकरी होते त्यांच्याकडे शेती शिवाय कोणतेही उपजीविकेचे दुसरे साधन नव्हते त्यांच्याकडे असलेल्या शेतीवर 2005 साली वरील बँकेच्या कर्ज घेतले होते मात्र सतत ची अतिवृष्टी व दुष्काळ यामुळे कर्ज परतफेड करणे शक्य नव्हते तरीदेखील संबंधित शेतकऱ्याने बँक अधिकाऱ्यांना भेटून तडजोडीसाठी विनंती केली व तडजोडी अंती 50,000 रुपये भरण्याची तयारी दाखवली मात्र सदरच्या भरणा करण्यासाठी शेतकरी बँकेत गेले असता संबंधित मॅनेजर यांनी सदर चि तडजोड मान्य न करता 90,000 रुपयांची मागणी केली. सदरची रक्कम या शेतकऱ्यास भरणे शक्य नसल्यामुळे त्यांनी आत्मदहनाचा इशारा देखील गेला होता मात्र प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर तुर्तास हे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. बँकेच्या मनमानी कारभारामुळे सदरची तडजोड होऊ शकली नाही त्यामुळे झालेला मनस्ताप ,चिंता, क्लेश ,दुःख व नैराश्य यामुळे या शेतकरीचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे .
संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व कमीत कमी मरणोपरांत तरी त्याच्या परिवाराला न्याय मिळून शेतावरील कर्जमाफी होऊन सातबारा कोरा करण्याची विनंती करण्यात आले आहे. यात कारवाई न झाल्यास मयत शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रहार तीव्र आंदोलन करून योग्य ती दिवाणी तसेच फौजदारी कारवाई करण्यास भाग पाडेल देखील देण्यात आला आहे .सदरच्या निवेदनावर मयत शेतकऱ्यांचे पुत्र शिवाजी दामू पाटील, प्रहार संघटनेचे ईश्वर बोरसे, मनोज राजपूत ,स्वप्नील जाधव, अमित देशपांडे ,राहुल राजपूत ,नीरज पाटील इत्यादी लोकांच्या सह्या आहेत.
Tags
news
