धुळे जिल्हा परिषदेत उदघाटन, दोन टप्प्यात राबविणार मोहीम
धुळे, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब-
माझी जबाबदारी’
ही महत्वाकांक्षी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत आरोग्य विभागातर्फे प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. या मोहिमेस जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने प्रतिसाद देत कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी सहकार्य करावे,
असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले.
धुळे जिल्ह्यात आजपासून
‘माझे कुटुंब-
माझी जबाबदारी’
अभियानास सुरवात झाली.
या मोहिमेचे उदघाटन जिल्हा परिषदेच्या आवारात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे,
जिल्हाधिकारी श्री.
यादव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा कुसुमताई निकम,
शिक्षण व आरोग्य समितीच्या सभापती मंगलाताई पाटील,
महिला व बालकल्याण समितीच्या सभापती धरती देवरे, कृषी समितीचे सभापती रामकृष्ण खलाणे,
मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए. जे. तडवी,
संजय बागूल,
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवचंद्र सांगळे,
जिल्हा साथ रोग अधिकारी डॉ. मनीष पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.
यादव म्हणाले,
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू दर आणि पॉझिटिव्हीटी दर कमी होत आहे. ही समाधानाची बाब असली, तरी कोरोना विषाणूला हद्दपार करावयाचे आहे. त्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ या मोहिमेत सहभाग नोंदवावा. जिल्ह्यात ऑक्सिजनयुक्त बेडची कमतरता नाही. पुरेसे बेड उपलब्ध आहेत. ऑक्सिजनयुक्त आणखी दोनशे बेड तयार करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पुरेसे मनुष्यबळ आणि औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. खासगी रुग्णालयांवर देखरेखीसाठी भरारी पथके नियुक्त करण्यात आले आहे. या पथकांकडे नागरिकांनी तक्रार असेल,
तर नोंदवायची आहे. प्रत्येक रुग्णालयाच्या बाहेर भरारी पथकातील सदस्यांची नावे व मोबाईल क्रमांक तसेच उपचारावरील खर्चाचे दरपत्रक दर्शनी भागात लावण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांच्या आरोग्याची सर्वांगीण काळजी घेत दैनंदिन जनजीवन सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘मिशेन बिगेन अगेन’ सुरू करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.
रंधे यांनी सांगितले, ‘माझे कुटुंब-
माझी जबाबदारी’
ही मोहीम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रभावीपणे राबविण्यात येईल.
नागरिकांमध्ये जनजागृतीचे प्रयत्न करण्यात येतील.
या मोहिमेत आरोग्य पथक आणि स्वयंसेवक घरोघरी जावून नागरिकांची आरोग्य तपासणी करतील.
दोन टप्प्यात राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेचा दुसरा टप्पा
14 ऑक्टोबरपासून सुरू होईल. तो 24 ऑक्टोबर
2020 रोजी पूर्ण होईल. या मोहिमेत नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा, असेही आवाहन श्री. रंधे यांनी केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी
‘माझे कुटुंब-
माझी जबाबदारी’
या मोहिमेची सविस्तर माहिती दिली.
|
कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी होम
क्वारंटाइनचा शिक्का ज्या नागरिकांच्या
हातावर मारण्यात आला आहे. त्यांनी स्वत:सह अन्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी
घरीच थांबावे. अशी व्यक्ती बाहेर फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई
करण्यात येईल. नागरिकांनीही जबाबदारीने वागावे. बेजबाबदार वागणाऱ्या नागरिकांना जबाबदार नागरिकांनी
आपल्या जबाबदारीची जाणीव करून द्यावी. -संजय यादव, जिल्हाधिकारी, धुळे |
