शिंदखेडा (प्रतिनिधी) : पक्षाने तरुणांना संधी दिली असून मस्तकात पदाची हवा जाऊ न देता जिल्ह्यात पक्षाची वाढ करावी, असे प्रतिपादन शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे यांनी येथे केले. तर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे असे धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी सांगितले.
शिवसेना शिंदखेडा मध्यवर्ती कार्यालय येथे दि. 14 रोजी शिवसेना पक्षाच्या शिंदखेडा व शिरपूर विधानसभा मतदार संघातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवरायांचे प्रतिमापूजन करण्यात आले. यानंतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलतांना श्री. अतुल सोनवणे म्हणाले की, तरुणांना संधी मिळाली असून जिल्ह्यात शिवसेनेचे चांगले संघटन तयार करण्यावर भर द्यावा. या निवडणुकीत आपल्याला विधानसभेवर भगवा फडकवायचा आहे. पक्षात जो प्रामाणिकपणे काम करेल त्याला संधी नक्की मिळेल. पद आज आहे उद्या नसेल. परंतु सर्वांनी संघटनेचे काम करत राहिले पाहिजे.
पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना जिल्हाप्रमुख श्री. हेमंत साळुंके म्हणाले की, नवीन पदाधिकाऱ्यांवर पक्षाने मोठी जबाबदारी सोपविली आहे. पक्षात पदे येतील-जातील ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. पदांचा योग्य वापर करुन शिवसेना घराघरात पोहोचविण्याचे काम केले पाहिजे. शिवसेनेचे काम हे समाजकारणाचे काम आहे. सध्या राज्यात सरकारविरुध्द कटकारस्थाने सुरु आहेत. राज्यात अराजकता निर्माण करण्याच्या प्रयत्न विरोधकांकडून होत आहे. परंतु विरोधक यात सफल होणार नाही. मिडीया सुशांत राजपूत, कंगना राणावत, चीन याशिवाय दुसरे काही दाखवत नाही. राज्यात अनेक महत्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे जनतेला जागृत करायचे काम शिवसैनिकांनी केले पाहिजे. शिवसैनिकांनी शिवसेना पक्षाची भूमिका सोशल मिडीयाच्या माध्यमातून संयमितपणे जनतेला पटवून देण्याचे काम करायचे आहे, असे ही श्री. साळुंके म्हणाले. यावेळी दोंडाईचा येथील दिपक मराठे, चुडामण बोरसे या तरुणांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. कार्यक्रमाची प्रास्ताविक डॉ. मनोज पाटील यांनी केली.
यावेळी नवनियुक्त उपजिल्हाप्रमुख श्री. भरतसिंग राजपूत, उपजिल्हासंघटक श्री.कल्याण बागल, शिंदखेडा तालुकाप्रमुख गिरीष देसले, शिरपूर तालुकाप्रमुख दिपक चोरमले, अत्तरसिंग पावरा, तालुका संघटक योगेश सूर्यवंशी, शिंदखेडा तालुका समन्वयक श्री.विनायक पवार यांचा सत्कार करण्यात आला. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी शिवसेना घराघरापर्यंत पोहचविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करु असे आश्वासन दिले.
यावेळी जिल्हा संघटक मंगेश पवार, कृ.उ.बा.समितीचे संचालक सर्जेराव पाटील, तालुका संघटक मनोज पाटील, शानाभाऊ धनगर, भडणेचे माजी सरपंच शहाजीराव देसले, संजय देसले, दोंडाईचा शहरप्रमुख चेतन राजपुत, शिरपूर शहरप्रमुख मनोज धनगर, उपतालुकाप्रमुख संतोष देसले, मनोज पवार, शैलेश सोनार, गणेश परदेशी, प्रदीप पवार, राकाशेठ रुपचंदाणी, युवासेनेचे आकाश कोळी, प.स.सदस्य ईश्वर पाटील, अनिकेत बोरसे, चंद्रसिंग ठाकूर, दिपक जगताप, विजय पावरा, योगेश ठाकरे, बंटी लांडगे, योगेश ठाकरे, बंटी लांडगे, सचिन शिरसाठ, नरेद्र पाटील, साहेबराव पावरा, प्रदिप पवार, राहुल पाटील, प्रशांत देसले, किरण देसले, विजय भोई, निलेश कोळी, अरविंद साळुंके, तानाजी पाटील, अशोक बोरसे, विशाल देसले आदी उपस्थित होते.
Tags
news
