शिरपूर तालुक्यातील शेतकरी उद्ध्वस्त, पंचनामे करून नुकसान भरपाईची पिंप्री,कुरखडी, थाळनेर परिसरातील शेतकऱ्यांची मागणी

 



 शिरपूर प्रतिनिधी- शिरपूर तालुक्यातील शेतकरी अस्मानी संकटाने अडचणीत आला असून तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे दिनांक 20 रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे यामुळे तालुक्यातील पिंप्री,कुरखडी, थाळनेर परिसरातील  शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले असून शेतातील ऊस कापूस केळी पपई सोयाबीन बाजरी ज्वारी तूर इत्यादी पिकांचे 100 टक्के नुकसान झाले  आहे. तयार असलेली पिके नष्ट झाली आहेत. याआधीच यादीच कोरोना संसर्गामुळे शेतकरी अडचणीत असताना आता या अस्मानी संकटामुळे शेतकरी अधिक आर्थिक अडचणीत सापडला असून शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत आता तो दिसत आहे. यापूर्वीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांनी खाजगी सावकार ,बँक ,सोसायटी विविध वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज घेऊन पिकांची लागवड केली होती मात्र हाताशी आलेले पीक देखील आता नष्ट झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडून त्याला मदतीचा आधार मिळाला नाही तर तो आत्महत्येच्या मार्गावर आहेत अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.
 यावर्षी मार्च 2020 मध्ये देखील पिकांचे व फळ पिकांचे यावेळी देखील शासनाने त्यांचे पंचनामे केले होते आणि अनेक शेतकऱ्यांचे फळपीक विमा देखील होते मात्र उद्यापर्यंत शेतकऱ्यांना शासनाकडून कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नाही किंवा विमा कंपनीकडून देखील नुकसान भरपाई मिळालेली नाही. किमान आतातरी प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन आमच्या शेती पिकांचे पंचनामे करावे शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई साठी मागणी करावी असे निवेदन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदार शिरपूर यांना देण्यात आले आहे तसेच या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी धुळे, महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य कृषी मंत्री याना देखील देण्यात आल्या आहेत .सदरच्या निवेदनावर पीडित शेतकरी महेंद्र सिंह राजपूत, मनोज राजपूत,जयसिंग राजपूत,प्रवीण राजपूत आनंद कोळी,,राजेंद्र धनगर, रामसिंग राजपूत ,अशोक धनगर ,प्रमोद गिरासे, योगेंद्र गिरासे ,भिका कोळी, दिनेश गिरासे व इतर या पिंपरी येथील शेतकऱ्यांनी तर थाळनेर परिसरातून जिल्हा परिषद सदस्य भैरवी प्रेमचंद शिरसाट  यांनी निवेदन दिले असून या निवेदनावर पंचायत समिती सदस्य विजय बागुल ,विजय खैरनार ,शेतकरी प्रेमचंद्र शिरसाट व ग्रामस्थ व शेतकरी इत्यादी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने