-आरोग्य विभागामार्फत 'कोविडमुक्त महाराष्ट्र'घोषित करण्यासाठी दोन टप्प्यात 'माझे कुटूंब माझी जबाबदारी'मोहीम राबवली जात आहे.या मोहिमेत नागरिकांचे आरोग्य तपासणीसाठी स्वयंसेवी संस्थानी सहभाग नोंदवावा असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.या आवाहनाला प्रतिसाद देऊन कोठली ता.शहादा येथील 'युवकमित्र परिवार'या संस्थेमार्फत वडाळी प्रा. आ केंद्रांतर्गत दहा गावामध्ये स्वयंसेवक नेमण्यात आले असून वडाळी प्रा.आ केंद्राला 1000 मास्क भेट देण्यात आले.यावेळी प्रा.आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राजन दुगड,युवकमित्र परिवाराचे समनव्ययक तथा पत्रकार देविदास माळी, प्रदीप महाले यांच्यासह वैद्यकीय कर्मचारी,आशा सेविका उपस्थित होते.
माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिमेतंर्गत आरोग्य कर्मचारी,आशा सेविका व युवकमित्रचे स्वयंसेवक घरोघरी जाऊन तपासणी करणार आहेत. व कुटूंबाची ऑनलाइन माहिती भरणार आहेत.युवकमित्र परिवारातर्फ परिसरातील दहा गावामध्ये स्वयंसेवक नेमण्यात आले असून तब्बल ७००० कुटुंबाचे सर्वक्षण करणार आहेत व प्रत्येक कुटूंबाला मास्क,सॅनिटायझर वाटप करणार आहेत.अशी माहिती युवकमित्रचे प्रवीण महाजन यांनी दिली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी आरोग्यसेवक आर.सी.चावडा, भारती चौधरी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ जे.जि.जावरे, संजय परदेशी,एस.एस.साळवे यांचे सहकार्य लाभले.
Tags
news
