केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवावी, शिंदखेडा शिवसेनेचे तहसीलदारांना निवेदन



*शिंदखेडा शिवसेनेने केले केंद्र शासनाच्या*
*पुतळ्याचे दहन, केद्र शासनाचा *निषेधार्थ घोषणाबाजी*

*शिंदखेडा (प्रतिनिधी)* : तालुका शिवसेनेच्या वतीने केद्रशासनाच्या निषेध व्यक्त करीत केद्राने कांदा निर्यात बंदीची केलेली घोषणा तात्काळ उठवून शेतकऱ्यांना कांदा विदेशात निर्यातीची सेवा द्यावी, अन्यथा शिवसेना कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने आंदोलन उभे करेल असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करुन येथील छत्रपती शिवाजी चौकात मोदी सरकारच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. दरम्यान शिंदखेडा तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले.
       निवेदनात म्हटले आहे की, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी कांदा निर्यात बंदीची घोषणा केली आहे. सदरचा निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. सद्यस्थितीत कोरोना महामारीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. मात्र राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कांदा पिकाला राबराब राबूनही निर्यात बंदीमुळे कांदाला कवडीमोल भाव मिळत आहे. मागील वर्षी देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याला भाव न मिळाल्याने कांदा फेकण्याची वेळ आली होती. यंदाच्या परिस्थितीत कांद्याला कुठेतरी भाव मिळत असतांना अचानक केद्र शासनाने कांदा निर्यात बंदीची घोषणा करुन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. तर एकीकडे सोने, पेट्रोल, डिझेल पासून तर कंपनीने उत्पादीत केलेल्या मालापर्यंत प्रचंड भाववाढ होत असतांना मोदी सरकारने याकडे दुलर्क्ष करुन शेतकऱ्यांच्या कांदा पिकावर निर्यातबंदी आल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. त्यामुळे केद्र शासनाने कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवावी. अशी मागणी केली आहे.
       निवेदनावर  जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, जिल्हा संघटक मंगेश पवार, कृ.उ.बा.समिती संचालक सर्जेराव पाटील, उपजिल्हा संघटक भाईदास पाटील, कल्याण बागल, तालुकाप्रमुख गिरीश देसले, तालुका संघटक शानाभाऊ धनगर, तालुका संघटक डॉ. मनोज पाटील, तालुका समन्वयक विनायक पवार, दोंडाईचा शहरप्रमुख चेतन राजपुत, शिंदखेडा शहरप्रमुख सागर देसले, उपतालुकाप्रमुख शैलेश सोनार, हिरालाल बोरसे, युवासेनेचे गणेश परदेशी, प्रदीप पवार, दोंडाईचा शहर संघटक राकाशेठ रुपचंदाणी, उपशहरप्रमुख दिपक मराठे, हातनूरचे उपसरपंच दिपक जगताप, पं.सं.सदस्य भगवान पिंपळे, संजय देसले, मनोज पवार, अशोक मराठे, प्रशांत जगताप, संदीप पाटील, संतोष माळी, एस.टी.कामगार सेनेचे तालुकाध्यक्ष आर.आर.पाटील, शरद बेहरे, साहेबराव पाटील, रविंद्र धनगर आदी पदाधिकारी उपस्थित होते.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने