अभिनेत्री कंगना रणावत यांना सुरक्षा व बदनामी करणाऱ्यांवर कारवाई साठी करणी सेनेचे निवेदन




धुळे -प्रतिनिधी)सध्या महाराष्ट्रात कंगना राणावत आणि संजय राऊत प्रकरण बरेच गाजत आहे त्या पार्श्वभूमीवर बॉलिवूडमधील कंगणा राणावत हीच्या विरोधात शिवसेनेचे संजय राऊत यांनी बेताल वक्तव्य केली. या प्रकरणात कंगना यांच्या बाजूने करणी सेना मैदानात उतरली आहे.
त्याबद्दल संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्यात यावी व कंगना राणावत यांना सुरक्षा देण्यात यावी. तसेच कंगना राणावत यांची बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना व युवा करनी सेना वतीने धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. 
त्यावेळी करनी सेना उत्तर महाराष्ट्र महामंत्री राजूदादा पैलवान,श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना धुळे तालुका अध्यक्ष धैर्यसिंग पवार, युवा करणी सेना धुळे कोषाध्यक्ष अरुण पवार,करणी सेना उपतालुका अध्यक्ष मंगेश राजपूत, करणी सेना युवा अध्यक्ष अभिजीत राजपूत,करणी सैनिक सचिन पवार, जयदीप पवार, आदी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने