उद्यमशील बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या स्वयंसेवकाकडून दिले जाताहेत अभ्यासाचे धडे




अनेक पाड्यात स्वयंसेवक चालवताहेत वर्ग
शहादा प्रतिनिधी: अश्विन सोनवणे
सध्या कोरोना नामक विषाणूमुळे देशभरात लॉक डाऊन व संचारबंदी सुरू आहे. गेल्या कित्येक दिवसापासून शाळा महाविद्यालय बंद आहेत. शहरी भागात मात्र शाळा बंद असल्या तरी विविध माध्यमांच्या सहाय्याने शिक्षण मात्र काही प्रमाणात का असेना सुरू आहे. याउलट ग्रामीण भागात विशेषतः अतिदुर्गम भागात ऑनलाइन शिक्षण हा प्रकार अद्यापही उपाय कारक होताना दिसून येत नाही  आहे म्हणून शाळा बंद असल्या तरी शिक्षण बंद होऊ होऊ द्यायचे नाही हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून गेल्या कित्येक दिवसापासून उद्यमशील बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे स्वयंसेवक अनेक पाड्यांमध्ये चिमुकल्यांना अभ्यासाचे धडे देत आहेत .त्यात अक्षर ओळख, अंक ओळख ,वाचन,लेखनाचे धडे मुलांना देऊन त्यांच्या शैक्षणिक प्रवास सुरू ठेवला आहे.देवळी पाडा( अजय पावरा), रेवानगर (मिनेश पावरा) ,घोटाळी पाडा(रवींद्र पावरा) ,जोयदा(तुलसीदास पावरा),कुढावद( बादल पटले),टाकली पाडा (नितीश गांगुर्डे),पाडली (विक्रम वडवी),शोभानगर( दीपक वसावे
), बोरी तांडा (सचिन राठोड),शेवगे तांडा,गोरंबा (तापसिंग पाडवी), मकतर झिरा(ठाणसिंग वसावे),सत्तार पाडा,(चेतन भोसले)आशा अनेक पाड्यात स्वयंसेवक कार्यरत आहेत. संस्थेच्या ह्या कार्याला स्थानिक ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभून येत आहे आणि संस्थेचे विशेष कौतुक केले जात आहे.सदर उपक्रमास संस्थेचे सचिव सुशील गव्हाणे ह्यांचे विशेष मार्गदर्शन लाभले .सर्व स्वयंसेवकांचे संस्थेचे अध्यक्ष श्री दीपक वसावे आणि उपाध्यक्ष रवींद्र गवळे ह्यांनी विशेष आभार मानले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने