शहादा (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाच्या नंदुरबार जिल्हा वैद्यकीय आघाडीचे अध्यक्षपदी डॉ . राकेश देविदास पाटील ( शहादा ) , उपाध्यक्षपदी डॉ . जितेंद्र मंगेश साळुखे ( मंदाणे , ता . शहादा ) तर डॉ . अमित मावची ( नवापूर ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे . डॉ . राकेश पाटील यांनी जिल्हा कार्यकारणी जाहीर केली असून डॉ . अमोल वैद्य ( शहादा ) , डॉ . संजय चौधरी ( अक्कलकुवा ) , डॉ . योगेश कुलकर्णी ( अक्कलकुवा ) , डॉ . विशाल पाटील ( नवापूर ) , डॉ . सचिन बदाने ( विसरवाडी ) , डॉ . राजेंद्र पाडवी ( धडगाव ) , डॉ . विजय चौधरी ( दामळदा ) , डॉ . श्रीराम पाटील ( म्हसावद ) , डॉ . योगेश पाटील ( लोणखेडा ) , डॉ . संदीप मोते ( भोंगरा ) , डॉ . राहुल पाटील ( असलोद ) , डॉ . अनिल साळुखे ( प्रकाशा ) , डॉ . संतोष परदेशी ( मकानी ) , डॉ . मुकेश पाटील ( मंदाणे ) , डॉ . सुनील मराठे ( कळमसर मोहिदा ) यांच्या समावेश आहे .

