*शहादा :* महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील कृषिकन्या शितल शाम पवार हिने कृषी विषयक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कृषी जागरूकता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाद्वारे आदर्श गाव बहरपुर येथे शेतकऱ्यांना बियाणांची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी बीज प्रक्रिया कशी करतात जनावरांची पचनक्रिया व दूध उत्पादन वाढविण्यासाठी चाऱ्याला युरिया वरील उपाय योजना तसेच बागकाम करण्याच्या पद्धती बद्दल माहिती देण्यात आली तसेच आधुनिक शेतीसाठी मोबाईल ॲप व त्याचा वापर कसा करावा तण नियंत्रणाच्या पद्धती, खतांचा योग्य वापर, शुद्ध दूध उत्पादन व दुधापासून नवनवीन पदार्थ कसे बनविण्याची माहिती देण्यात आली. यावेळी सरपंच दिलबर पवार पोलीस पाटील दिलीप पवार श्याम पवार व ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags
news
