शहादा (प्रतिनिधी): महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाच्या सदस्यपदी डॉ . किशोर पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे . भाजपाच्या प्रदेश कमिटीतर्फे नूतन कार्यकारणी घोषित करण्यात येत आहे. त्यातील महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चा कार्यकारणी प्रदेश वरिष्ठ स्तरावरून घोषित करण्यात आली असून त्यात नंदुरबार जिल्ह्यातील भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष डॉ . किशोर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ . किशोर पाटील हे भाजपच्या माध्यमातून विविध पदांवर कार्यरत असून त्यांनी १९९१ पासून भाजप मध्ये ३ वेळा तालुकाध्यक्ष, जिल्हा चिटणीस असे विविध पदे त्यांनी भुषवली आहेत. डॉ. पाटील हे पदावर असतांना त्यांनी पक्षासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. व जनसामान्यांचे प्रश्न देखील सोडवण्याचा प्रयत्न केला आहे . भाजपासोबत सातत्याने सोबत असल्याने वरिष्ठ स्तरावरून याची दखल घेत डॉ.पाटील यांची भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाच्या सदस्य पदी नियुक्ती केली आहे . त्यांच्या या निवडीबदल भाजपा चे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ अभिनंदन करीत आहेत .
Tags
news
