शहादा (प्रतिनिधी) : - शहादा जायन्ट्स ग्रुप तर्फे कोरोना काळातील तानतनावाचे दिवसावर मात करुण निरोगी जीवनशैली आत्मसात करण्यासाठी योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी परिसरातील विद्यार्थीना अनुलोम -विलोम, प्राणायाम, ध्यान व पार्थना घेण्यात आली सदर योगाभ्यासाठी प्रमोद सोनार यांचे मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय सोनार होते तर प्रमुख पाहुणे जायन्ट्स चे अध्यक्ष भुषण बाविस्कर, के. के. सोनार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक भुषण बविस्कार तर आभार के. के. सोनार यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी हरीश माळी, संदीप पवार यांनी परिश्रम घेतले.
Tags
news
