शहादा (प्रतिनिधी) :- शहादा येथील नवीन पोलिस ठाणे इमारतीच्या परिसरात बारा स्ट्रिट लाईट व एक हायमास्ट लॅम्प चे लोकार्पण शहादा-तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले.
शहरातील दोंडाईच्या रस्त्यावर वनविभागाच्या कार्यालयाजवळील शहादा पोलीस स्टेशनची इमारत आहे. गेल्या वर्षभरापासून येथे पोलीस ठाण्याचा कारभार सुरू आहे या परिसरात विद्युतीकरण व्हावे यासाठी आमदार राजेश पाडवी यांनी प्रयत्न केले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाशिक येथील विद्युतीकरण विभागामार्फत या संपूर्ण परिसरात बारा स्ट्रीट लाईट व एक हायमास्ट लॅम्प बसविण्यात आलेत आज त्यांचे लोकार्पण सोहळा आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी आमदार राजेश पाडवी, जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील , पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, बांधकाम अभियंता श्री. इंगळे , शहराध्यक्ष विनोद जैन, अदिवासी मोर्चा जिल्हा अध्यक्ष लक्ष्मीकांत वसावे, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष किन्नरी सोनार, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सचिन देवरे, जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र जमदाडे, मा.शहर अध्यक्ष अतुल जयस्वाल, दिनेश खंडेलवाल, शहर उपाध्यक्ष पंकज सोनार, गौरव जैन, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शरद पाटील, शहराध्यक्ष राजीव देसाई, महामंत्री हितेंद्र वर्मा, वैभव सोनार, तुषार चित्ते, जयेश देसाई निलेश मराठे, नजमोदिन खाटीक, ठेकेदार तुषार पाटील, लोकेश पाटील उपस्थित होते.
Tags
news
