शहादा (प्रतिनिधी) :- भोरटेक (ता.शहादा) येथे पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.
पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त ग्रुप ग्रामपंचायत भोरटेक च्या प्रांगणात त्यांच्या प्रतिमेस भारतीय जनता पक्षाचे महिला मोर्चा शहादा तालुका अध्यक्ष प्रतिभाबाई पवार, सरचिटणीस जयश्रीबाई जाधव, चिटणीस संगीताबाई गोकुळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. व प्रत्येक कार्यकर्ते व सदस्यांच्या घरांवर भाजपचे झेंडे लावण्यात आलेत. यावेळी जिल्हा महिला मोर्चा सदस्य सुलुबाई गिरासे, तालुका महिला मोर्चा सदस्य प्रतिभा कोळी, चित्राबाई गिरासे, मंगला गिरासे, मनीषा पवार, अनिता पवार, दीपाली पवार, रीना पवार, ज्योती पवार, सुवर्णा पवार आदी उपस्थित होते.
Tags
news
