नाशिक महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त राधाकृष्ण गमे यांची नाशिकच्या विभागीय महसूल आयुक्तपदी नियुक्ती






नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे यांजकडून 

नाशिक-:नाशिक महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त राधाकृष्ण गमे यांची नाशिकच्या विभागीय महसूल आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विभागीय महसूल आयुक्त राजाराम माने आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले._

_नाशिकचे मनपा आयुक्त असतांना राधाकृष्ण गमे यांनी नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासनावर चांगली पकड बसविली. २० महिन्यांच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी आपल्या कुशल नेतृत्वाचा प्रत्यक्ष कामाने ठसा उमटविला. महानगराचे अनेक महत्वाचे प्रकल्प त्यांनी मार्गी लावले, त्यातील काही पूर्णत्वास नेले. केंद्र सरकारच्या स्वछता सर्वेक्षणात देशात ११ व्या स्थानी तर स्मार्ट शहरांत राज्यात प्रथम क्रमांकावर आणून नाशिकचे नाव रोशन केले. कोरोना काळातही रुग्णांच्या व्यवस्थेपासून मृत्युदर कमी करण्यासाठी त्यांनी कठोर मेहनत घेतली._पाच डिसेंबर २०१८ रोजी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सुञ हाती घेतली होती वीस महीन्यात त्यांची कारकीर्द संमिश्र राहिली स्वभावाने मितभाषी व संयमी म्हणून कोणत्याही वादात थे सापडले नाही माञ वादग्रस्त शहर बससेवा, स्वच्छता कर्मचारी, पेस्ट कंर्टोल ठेक्यामुळे त्याच्या भोवती वादाचे ग्रहण कायम राहीले. अपुरे मनुष्यबळ असताना ही नाशिक पालिकेला स्वच्छ शहर स्पर्धा मध्ये देशातील पहिल्या अकरा शहरात स्थान मिळवून दिले स्मार्ट सिटीमध्ये महाराष्ट्र राज्य यामध्ये प्रथम क्रमांक मिळाला महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे याच्यानंतर महापालिका चा विस्कळीत झालेला गाङा राधाकृष्ण गमे यांनी पुर्वपदावर आणत नगररचना विभागाचा महसूल उंचावला दरम्यान गमे हे पदोन्नतीने गेले काही दिवसापासून  विभागीय आयुक्त होणार अशी चर्चा होत होती माञ पदोन्नती होण्यापुर्वीच त्यांची बदली झाली माञ शासनाने विभागीय आयुक्त पद अवनत करून राधाकृष्ण गमे यांना नियुक्ती करण्यात आली आहे.                                         दरम्यान नाशिक जिल्ह्यामध्ये राधाकृष्ण गमे यांची कनिष्ठ पदावरून सर्वाच्च पदांवर नियुक्ती झाली आहे ह्यापूर्वी गमे यांनी अप्पर जिल्हा अधिकारी, जातपङताळणी समिती अध्यक्ष, महापालिका आयुक्त, आणि महसूल व महापालिका सेवेनंतर विभागीय आयुक्त पदांवर नियुक्ती झालेले एकमेव अधिकारी ठरले आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने