सुदर्शन न्यूज चैनल ची मान्यता रद्द करा व सुरेश चव्हाण वर कारवाई करा, मनमाड शहर सामाजिक संघटना तर्फे मुख्यमंत्री यांच्याकडेे निवेदनद्वारे मागणी,





नाशिक  जिल्हा प्रतिनिधी  शांताराम दुनबळे यांजकडून 

नाशिक-: देशामध्ये  व महाराष्ट्र राज्यामध्ये अराजक व अशांतता माजवण्याच्या उद्देशाने अल्पसंख्यानक समाजाला टार्गेट करून त्यांच्या विरोधात सर्वसामान्य नागरिकांच्या मनात द्वेष निर्माण करून सतत धार्मिकभावना भडकावणे  तसेच देशावर असलेले प्रेम आणि एक निष्ठेतेला जाणून बुजून बाधा पोहचवून विद्वेष पसरविणाऱ्या हेतूने,निपक्षपणे कार्य करणाऱ्या लोकसेवा आयोगाच्या कार्यक्षमते वर गंभीर आरोप करणाऱ्या सुदर्शन न्यूज ची मान्यता रद्द करण्यात यावी,
तसेच सुरेश चव्हाण याच्या वर भारतीय संविधान आर्टिकल 30 ची पायमल्ली केल्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा,अशी मागणी निवेदन द्वारे मनमाड शहर सामाजिक कार्यकर्ते तर्फे मुख्यमंत्री साहेबांना करण्यात आली,निवेदना वर एजाज शाह,जाफर मिर्जा,कयाम सैय्यद ,कादिर शेख,जाहिद शेख,वसीम शाह,सद्दाम अत्तार,कबीर बागवान,अमजद शेख,बुढन बाबा,फिरोजशेख,इं मुराद शेख, शकील शेख आबीद शेख,तौसिफ खान,मुबिन शाह,आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थीत होते,

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने