*नाशिक:*
_नाशिक महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त राधाकृष्ण गमे यांची नाशिकच्या विभागीय महसूल आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विभागीय महसूल आयुक्त राजाराम माने आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले._
_नाशिकचे मनपा आयुक्त असतांना राधाकृष्ण गमे यांनी नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासनावर चांगली पकड बसविली. २० महिन्यांच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी आपल्या कुशल नेतृत्वाचा प्रत्यक्ष कामाने ठसा उमटविला. महानगराचे अनेक महत्वाचे प्रकल्प त्यांनी मार्गी लावले, त्यातील काही पूर्णत्वास नेले. केंद्र सरकारच्या स्वछता सर्वेक्षणात देशात ११ व्या स्थानी तर स्मार्ट शहरांत राज्यात प्रथम क्रमांकावर आणून नाशिकचे नाव रोशन केले. कोरोना काळातही रुग्णांच्या व्यवस्थेपासून मृत्युदर कमी करण्यासाठी त्यांनी कठोर मेहनत घेतली._
Tags
news
