धुळे - धुळे तालुका पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत छापा टाकून 10 लाख 50 हजार 896 रुपयांचा अवैध गुटका साठा व तंबाकू जन्य पदार्थ यांचा साठा जप्त केला आहे.
यात मिळालेल्या माहिती नुसार धुळे लालुका पोलिस स्टेशन चे पो. नि. दिलीप गांगुर्डे ,यांनी एक पथक तयार करून मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी छापा टाकला असता दिलीप वसंत जगताप वय 24 लेंडाणे ता. मालेगाव जिल्हा नाशिक हल्ली मुक्काम मोरतांडा जिल्हा धुळे यांनी मोरतांडा गावात रेल्वे स्टेशन ते तरवाडे गावाच्या कडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या गाड्यात अवैद्य प्रतिबंधक गुटख्याचा साठा करून ठेवला होता छापा टाकून सदरच्या पथकाने 20लाख 50 हजार 896 रुपये किमतीच्या अवैध तंबाखूजन्य गुटख्याचा माल जप्त केला आहे .
सदरची कारवाई दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी करण्यात आली.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित , अप्पर पोलीस अधीक्षक राजू भुजबळ उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई कैलास चौधरी पो.का. राजू मोरे, जितेंद्र सोनार,प्रवीण पाटील, चेतन चव्हाण,प्रकाश भावसार, धीरज सांगळे, राकेश शिरसाट राकेश महाले, वाहन चालक दिलीप महाले इत्यादींच्या पथकाने केली आहे
Tags
news

