श्रीराम मंदिर देवस्थानचे मठाधिपती महंत सतिषदास महाराज भोंगे यांचे हस्ते विधीवत पुजा करून ध्वजारोहण



 शिरपूर :  झाले रामराज्य काय उणे आम्हासी।। हया संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे जिर्णोद्धाराचाच क्षण श्रावण वद्य प.2 वार बुधवार दि. 5/8/2020 हया दिवशी साधु, संत व महंत यांचे उपस्थितीत भगवंत कृपा प्राप्त केलेले आपले सर्वांचे लाडके भारतमातेचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी सो. यांचे हस्ते अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या  भूमिपूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.संपुर्ण भारतात धार्मिक वातावरण प्रखर तेजोमय दिसत होते.अशा हया मंगलमय प्रसंगी श्रीराम मंदिर देवस्थान(श्री भोंगे) शिरपुर जि.धुळे येथे ब्राम्हमुहूर्तावर श्रीराम मंदिर देवस्थानचे मठाधिपती महंत सतिषदास महाराज भोंगे यांचे हस्ते विधीवत पुजा करून ध्वजारोहण करण्यात आले. श्रीरामनामाचा जप, श्रीरामरक्षाचे पठण करण्यात येऊन ठिक 11 वा. वारकरी भजन संगीताचा कार्यक्रम होऊन रामानुजाचार्य परंपरेप्रमाणे श्रीराम भक्तांचे उपस्थितीत भागवताचार्य, गो-सेवक, वेद पारंगत प्रमोद महाराज भोंगे यांनी श्रीरामरायाचे मागणीपर पद म्हणून समस्त श्रीराम भक्तांनी श्रीरामरायाच्या भजनाचा गजर करून ठिक दु.12 वा. 40 मि. महाआरतीचा कार्यक्रम संपन्न होऊन प्रसाद वाटप करण्यात आला. रात्री 10 वा. पर्यंत भाविक भक्तगण दर्शनासाठी येत होते. दि. 5 ऑगस्ट 2020 या ऐतिहासिक दिवसाचे आपण सर्व जण साक्षीदार आहोत हे आपले सर्वांचे परमभाग्य होय. श्रीराम मंदिरात भोंगे परिवाराकडुन आकर्षक लायटींग रोषणाई करण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विवेक रघुनाथ भोंगे,श्री प्रशांत रघुनाथ भोंगे, जयेश विवेक भोंगे,चि. प्रथमेश प्रमोद भोंगे व समस्त परमभागवतभक्तांनी मोलाचे सहकार्य केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने