इंग्लंडमध्ये वास्तव्य असलेल्या मराठमोळ्या तरूणीचे मेक इन इंडिया हे गाणे स्वातंत्र्य दिनी होणार प्रदर्शित कविता राजपूत यांनी तयार केले गाणे

  



 (महेंद्र सिंह राजपूत ) -   इंग्लंडमध्ये वास्तव्यात असलेल्या मराठमोळ्या तरुणी  कविता राजपूत यांचे  बहुचर्चित गाणे  मेक इन इंडिया  हे त्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी देशवासीयांना समर्पित करत असून त्यांच्या या गाण्याचे भारतात लॉन्चिंग होत आहे. मूळच्या भारतीय असलेल्या  आणि सध्या इंग्लंडमध्ये वास्तव्यात असलेल्या  कविता राजपूत यांनी  तयार केलेले हे गाणे मेक इन इंडिया  हे भारत सरकारच्या मा.पंतप्रधान नरेंद्र जी मोदी  यांची संकल्पना मेक इन इंडिया  यावर आधारित असून  मोदीजीं ची संकल्पना देश विदेशात  पोहोचवण्यासाठी  देशभक्तीने प्रेरित होऊन  त्यांनी हे गाणे तयार केले आहे. या गाण्याचे लेखक ,गायक आणि निर्माते  कविता राजपूत  या माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांना आपले प्रेरणास्त्रोत मानतात  आणि म्हणून  त्यांची संकल्पना मेक इन इंडिया  व देशाच्या विकासाकडे होणारी जी वाटचाल सुरू आहे त्यात मेक इन इंडियाच्या खूप मोठा सहभाग असणार आहे. आणि याच मेक इन इंडिया या संकल्पनेच्या प्रचार आणि प्रसारासाठी  समाजात व देश-विदेशात याबाबत जागरूकता निर्माण व्हावी व सर्वसामान्यांपर्यंत हा संदेश पोहोचवता यावा  आणि देशाच्या विकासात वाढ व्हावी हा विचार मनात ठेवून या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे.
 महाराष्ट्र राज्यातील शिरपूर तालुक्यातील त्या रहिवासी असून श्री दिनेश लालसिंग तवर यांच्या त्या  पत्नी आहेत. आणि हे दोघेही दांपत्ये इंग्लंड युकेमध्ये एका आयटी कंपनीत कार्यरत आहेत.  कविता राजपूत यांचे बालपण गुजरात राज्यातील  देव्हाळा या गावात गेले असून लहानपणापासूनच त्यांना गायनाची व लिखाणाची आवड होती. शालेय जीवनात जिल्हा राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये भाग घेऊन अनेक पारितोषिके त्यांनी मिळवली होती. त्यांचे वडील कोमलसिंग चंद्रसिंग राजपूत यांच्या देखील त्यांच्या यशात मोलाचा वाटा असून त्यांनी शिक्षण व संगीत यासाठी सतत त्यांना प्रोत्साहन दिले आहे.
 महाविद्यालयीन जीवनात त्यांनी शास्त्रीय संगीत शिकण्यास सुरुवात  केली होती, आजवर भारतात आणि परदेशात  त्यांनी मोठ्या पातळीवर संगीताचे कार्यक्रम  सहभाग घेऊन सादर केले आहेत. आज परदेशात राहून देखील त्या भारताचा विचार करतात आणि म्हणून  देशप्रेम हे फक्त देशात राहून नाही तर परदेशात राहून देखील व्यक्त करता येते  या भावनेतून त्यांनी या गाण्याचे लिखाण केले असून  या गाण्याच्या माध्यमातून  मेक इन इंडिया या महत्वकांक्षी योजनेचे  ते प्रचार आणि प्रसार करत आहेत.
 स्वातंत्र्यदिनी  भारतात ते आपल्या या गाण्याच्या  मोठ्या जोरात  लॉन्चिंग करत आहेत आणि हे गाणे यूट्यूब च्या माध्यमाने आपल्यासमोर प्रदर्शित करणार आहेत.  त्यामुळे त्यांच्या या गाण्याची प्रतीक्षा देश व विदेशातील  सर्वांनाच लागून असून लवकरच त्यांचे हे गाणे प्रदर्शित होत आहे.
 परदेशात राहून देखील आपले देश प्रेम व्यक्त करत  त्यांनी भारतासाठी हा विचार केला व या गाण्यातून आपले देश प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न केला म्हणून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक आणि स्वागत होत आहे. त्यानां शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने