उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त आंबे येथे पर्यटनासाठी शिरपूर पॅटर्न बंधाऱ्यात बोटींग सेवेचे लोकार्पण




शिरपूर - प्रियदर्शनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या वाढदिवसा निमित्त आंबे गाव येथे मंगळवारी दि. २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय चांगली सुविधा उपलब्ध करण्यात आली असून शिरपूर पॅटर्न बंधाऱ्यात 'बोटींग सेवे' चे लोकार्पण तालुक्याचे आमदार काशिराम पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी तालुक्याचे आमदार काशीराम पावरा, आंबे वि. का. सोसायटी चेअरमन रमेश माळी, माजी उपनगराध्यक्ष गोकुळसिंग राजपूत, शिरपूर साखर कारखाना संचालक जयवंत पाडवी, बोराडी येथील सामाजिक कार्यकर्ते रमण पावरा, मुकेश आर. पटेल मिलिटरी स्कूलचे प्राचार्य दिनेशकुमार राणा, अमरिशभाई आर. पटेल सीबीएसई स्कूलचे प्राचार्य निश्चल नायर, मुकेश आर. पटेल सीबीएसई स्कूलचे प्राचार्य पी. सुभाष नायर, शिरपूर पीपल्स बँक संचालक संजय चौधरी सामाजिक कार्यकर्ते भालेराव माळी, नरेंद्र पाटील, सुरेश अहिरे, अनिल आखाडे, आंबे सरपंच मुकेश पावरा, काशिनाथ पावरा, पुनश्या पावरा, सजन पावरा, मदन पावरा, अस्तर पावरा, जगतसिंग पावरा, रेहान पावरा, पप्पू पावरा, जितु पावरा, लोहाऱ्या पावरा, सखा पावरा, दिनेश पावरा, संतोष चौधरी, ईश्वर चौधरी, सुनील चौधरी, युवराज चौधरी, उत्तम चौधरी तसेच भूपेशभाई ग्रीन आर्मी चे सदस्य धीरज देशमुख, बापू महाजन, ललित फिरके, जितेंद्र शेटे, बाबाजी महाजन, प्रवीण बागले, गिरीश सनेर, हरपाल राजपूत, जय माळी, रितेश राजपूत, तुषार बोरसे, निलेश पाटील, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी विविध ठिकाणी वृक्षारोपण करुन सुविधा पुरविण्याचे काम करण्यात आले.
 
आदिवासी बंधू व भगिनी तसेच सर्व ग्रामस्थ यांच्यासाठी आंबे गावाच्या परिसरात सर्वत्र पटेल परिवाराच्या सहयोगातून मोठे पर्यटन स्थळ विकसित होत आहे. तालुक्यातील आदिवासी भागात अशी विकासाची गंगोत्री अवतरणे व पर्यटन स्थळ निर्माण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे ही फारच आनंदाची व अभिमानाची बाब आहे. आंबे गावात अजून अनेक संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

उद्योगपती तथा नगरसेवक तपनभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त दि. १७ ऑगस्ट रोजी तालुक्यातील आंबे येथील द्वेता पटेल नगर चे उद्घाटन करण्यात आले होते. या दिवशी येथील पाड्यांवर ग्रामस्थांना विविध सुखसोयी पुरविण्याबाबत त्यांनी आश्वासन दिले होते. विविध सोयी सुविधा पुरविण्यास भुपेशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त प्रारंभ देखील करण्यात आला.

माजी मंत्री अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या दूरदृष्टीने शिरपूर पॅटर्नने शिरपूर तालुक्यात कायापालट झाला आहे. तालुक्यातील आंबे गावात आतापर्यंत एकूण ४ बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. यामुळे ३२७ हेक्टर क्षेत्र जमिनीवर बागायती झाली. शिरपूर पॅटर्न कामामुळे २,५१,५०० घन मीटर गाळ शेतात टाकण्यात आला. येथील बंधाऱ्यांमुळे ३२.५० कोटी लिटर पाणी थांबविण्यात यश आले. ६४.४० कोटी लिटर पाणी जमिनीत जिरत आहे. म्हणजेच एकूण ९६.९० कोटी लिटर पाणी जमा झाले. ८ कि.मी. लांबीचे शेतात रस्ते तयार करण्यात आले असून येथे मत्सशेतीस चालना देण्यात आली. याचप्रमाणे तालुक्यात एकूण २४० बंधारे बांधण्यात आल्याने तालुक्यासाठी चमत्कार झाला आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने