शिरपूर शहादा रस्त्यावर वाघाडी शिरपूर दरम्यान खड्ड्यांचे साम्राज्य दुरुस्ती न झाल्यास सां.बा.विभाग जबाबदार

 



 शिरपूर प्रतिनिधी  - शिरपूर तालुक्यातील शिरपूर शहर ते शहादा कडे जाणाऱ्या रोडवर शिरपूर वाघाडी या अंतरावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून  रस्ता दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी यासाठी जिल्हा परिषद सदस्य सौ.अभिलाशा भरत पाटील यांनी उपकार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शिरपूर यांना पत्रान्वये तक्रार सादर केली आहे. यात असे नमूद करण्यात आले आहे की वाघाडी ते शिरपूर या रस्त्यावर  कर्मवीर अण्णा साहेब पेट्रोल पंपाजवळ अत्यंत दुर्दशा होऊन फार मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे दररोज छोटे-मोठे अपघात होत असतात .याबाबत वारंवार आपणास दूरध्वनीवरून सूचित करण्यात आले होते मात्र संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याचे दुरुस्ती करून घेतलेली नाही. यापुढे या रस्त्यावर दुर्घटना झाल्यास त्याला सर्वस्वी पण ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अधिकारी जबाबदार राहतील. तसेच वाघाडी ते गिधाडे या रस्त्याचे देखील नुकतेच काम झाले आहे मात्र मोठे मोठे खड्डे व झुडपे झालेली आहेत तरी याबाबत आवश्यक ती कारवाई करून संबंधित ठेकेदारास आदेश करून रस्त्याचे खड्डे बुजवून काटेरी झुडपे काढण्यात यावी याबाबत निवेदन देण्यात आले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने