24 हजारांची मागितली लाच, बांधकाम अभियंता आणि ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

 



 नंदुरबार प्रतिनिधी  - नंदुरबार जिल्ह्यातील शहादा   पंचायत  समितीमध्ये   रस्ता कामाच्या बिलापोटी  24 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी पंचायत समितीच्या बांधकाम अभियंता  व ग्रामसेवकावर  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
 याबाबत वृत्त असे की शहादा तालुक्यातील खाजगी ठेकेदार  व मूळ तक्रारदार यांनी 2018 -19  या कालावधीत टेंभली ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत होळ गुजरी ग्रामपंचायतीचे वस्ती रस्ता काँक्रीटीकरणाचे काम जनसुविधा 2515 योजनेअंतर्गत रुपये 9,99,000 / ₹ कामाची निविदा टेम्बली तालुका शहादा जिल्हा नंदूरबार या ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आली होती.
सदर चे काम नमूद एजन्सी ने तक्रारदार यांना सब कॉन्ट्रॅक्ट म्हणून दिले होते व तसा करारनामा करण्यात आला होता सदर चे काम डिसेंबर 2019 मध्ये पूर्ण झाल्याने टेभर्ली ग्रामपंचायतीला जिल्हा परिषद नंदूरबार यांनी ₹ 8,05,200/ रकमेचा चेक मार्च महिन्यात वर्ग केला परंतु रक्कम न मिळाल्याने त्याबाबत तक्रारदार यांनी आरोपी लोकसेवक राजेश लक्ष्मण पाटील व 41 कनिष्ठ अभियंता पंचायत समिती बांधकाम विभाग शहादा व  प्रवीण सिंग कोमल सिंग गिरासे वय 40 ग्रामसेवक टेंभली ग्रुप ग्रामपंचायत तालुका शहादा याना विचारले असता त्यांनी नमूद कामाच्या संबंधाने तक्रारदाराकडे चेक काढून देणे साठी 24,000/ रुपये लाचेची मागणी केली  होती . तकारदार यांनी लाच लुचपत विभागात तक्रार केली होती . यावेळी केलेल्या कारवाईत आरोपी लोकसेवक यांनी स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी अप्रामाणिकपणे भ्रष्ट बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करून लाचेची मागणी केली म्हणून दिनांक 08/06/2020 रोजी पंचायत समिती कार्यालय शहादा येथे  पंचा समक्ष तपासणी केली  व तपासाअंती  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई  शिरिष जाधव पोलीस उप अधिक्षक, ला. प्र. वि. नंदूरबार युनिट यांच्या मार्गदर्शनाखाली जयपाल अहिररराव 
पोलीस निरीक्षक ला प्र वि नंदूरबार व  इतर सहकारी*HC/ उत्तम महाजन,संजय गुमाणे, मनोहर बोरसे ,PN, दीपक चित्ते ,संदीप नावडेकर, मनोज अहिरे  अमोल मराठे 
,WPN ज्योती पाटील  इ च्या पथकाने केली आहे .                                                                                



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने