शिरपूर प्रतिनिधी - देशात केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने 9 ऑगस्ट 2020 क्रांती दिवस ,भारत बचाओ किसान मुक्ती दिन म्हणून पाळण्यात येत असतो. या निमित्ताने महाराष्ट्र राज्य किसान सभा धुळे जिल्हा यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सो, राज्याचे मुख्यमंत्री नामदार उद्धवजी ठाकरे साहेब आणि तहसिलदार सो शिरपूर यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले आहे .
यात प्रामुख्याने कोरोना काळात सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या रब्बी पिकाची कर्जमुक्ती करावी, किसान क्रेडिट कार्ड देण्यात यावे घेतलेल्या कर्जावर व्याज माफ करावे आणि सक्तीची वसुली थांबवावी,शेतकरी कर्ज मुक्त करण्याच्या कायदा पास करावा, शेतकऱ्यांच्या सर्व उत्पादनाला उत्पादन खर्चाच्या किमान 50 टक्के नफा केंद्र सरकारने जाहीर करावा आणि या भावात पिके खरेदी करण्याची यापेक्षा कमी दरात खरेदी करणे फौजदारी गुन्हा असल्याचे जाहीर करावे,
शेतकरी विरोधी अध्यादेश रद्द करावा आणि सर्व शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यात यावे, साठेबाज आणि काळाबाजार करणार्यांवर नियंत्रण ठेवून मजूरांना rs.1000 पेन्शनच्या कायदा करावा,
डिझेल पेट्रोलचे भाव कमी करावे, सन 2020 विधेयक रद्द करा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, मनरेगा द्वारे मिळणाऱ्या कामांचे दिवस वाढवून किंवा किमान वेतन मजुरी द्यावी, कोरोणा काळात प्रत्येकाला रेशन मध्ये 15 किलो धान्य 1 किलो तेल 1 किलो दाळ 1 किलो साखर द्यावी, आदिवासी आणि इतर शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून वनजमिनींवर जबरदस्तीने झाडे लावणे थांबवावे जमिनी दुधाला अनुदान द्यावे , कोरोना काळातील विज बिल रद्द करावे ,कांद्याला प्रति क्विंटल 1000 रुपये अनुदान द्यावे, दहीवद साखर कारखाना सुरु करावा ,तालुक्यातील सहकारी सूतगिरणी येथील धारकांची रक्कम परत करावी इ
मागण्यांसाठी सदरचे निवेदन देण्यात आले असून या निवेदनावर एडवोकेट मदन परदेशी एडवोकेट हिरालाल परदेशी एडवोकेट संतोष पाटील, रामचंद्र पावरा, दिनेश पावरा, प्रमोद पाटील, जितेंद्र देवरे ,संजय पाटील इत्यादींनी सह्या केले आहे
Tags
news
