शहादा प्रतिनिधी अश्विन सोनवणे*
नंदुरबार:- दि 30 ऑगस्ट रोजी नंदूरबार येथील श्री संतसेना प्रेरीत व्यायाम शाळेच्या वतीने श्री. गणपती बाप्पा प्रथम वर्ष व गणेश उत्सवा निमीत्ताने रक्तदान शिबिर नंदुरबार शहरातील हाट दरवाजा गुजर न्हावी गल्लीत आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री चंद्रकांत गवळी उपस्थित असून त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी ४० जणांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रम यांच्या उपस्थित मा.गोपाल भैय्या तसेच समस्त गूजर नाभिक समाजाचे उपाध्यक्ष श्री. नगीनजी सोनवणे, समस्त गूजर नाभिक समाजाचे प्रसिध्दी प्रमूख श्री. भरतभाई सोनवणे, 21कार्यकारिणी सदस्य श्री राजेंद्र भाई. नांदेडकर तसेच श्री. संतसेना प्रेरीत व्या यम शाळेचे अध्यक्ष व त्याचे सदस्य आणि शहादा येथील गोकर्ण महादेव मंदीर चे सदस्य श्री अजय भाई सोनवणे तसेच मोठ्या संख्येने समाज बांधव तरूण होतकरू समाज सेवेसाठी नेहमी मदतीला धावून येणारी युवाशक्ती हजर होते.आज त्यांनी दाखवून दिले की रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे यामुळे परिसरात कौतुक होत आहे.
*
Tags
news
