स्वीकृती फाऊंडेशन, व वीर तानाजी मित्र मंडळ, ओझर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न .

                   






. नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे यांजकडून नाशिक -:ओझर येथे स्वीकृती फाऊंडेशन व वीर तानाजी मिञ मंङळ यांच्या सयुंक्त विद्यमाने नुकतेच रक्तदान शिबिर संपन्न झाले  ३० ऑगस्ट २०२० रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. ज्यामध्ये मनिषा ढिकले- अध्यक्ष स्वीकृती फाऊंडेशन, नाशिक. तसेच खजिनदार- सिद्धांत वाडेकर, सचिव- सरला मंडलिक,  तसेच वीर तानाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष- वैभव कदम, शुभम बोस व इतर सहकारी यांनी हा कार्यक्रम घडवून आणला.  गणेश उत्सवाच्या पाश्र्वभुमिवर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये कोरोना पासून बचाव व्हावा व  संसर्ग होऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली गेली. तसेच रक्तदान शिबिराला देखील जनतेचा व मंडळाचा भरघोस प्रतिसाद लाभला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने