शिरपूर प्रतिनिधी - धुळे जिल्ह्यात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटत असून राज्यभरातून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष माननीय सुरज पाल अमू , महाराष्ट्र प्रदेश चे युवा अध्यक्ष गिरीश दादा परदेशी, महाराष्ट्राचे प्रवक्ते दिनेश सिंह राजपूत, सोशल मीडिया अध्यक्ष अतुल सिंह परदेशी, आणि संघटनेच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली , संपूर्ण महाराष्ट्रातून या घटनेच्या करणे सेनेने निषेध व्यक्त केला असून, संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करणे, त्यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय खर्च वसूल करणे व या प्रकरणाला जबाबदार धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा यासाठी करणी सेना आक्रमक झाली आहे.
आज शिरपूर तालुक्याच्या वतीने करणी सेनेचे युवा पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार शिरपूर यांना निवेदन देऊन सदर घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क माफ करावे, विद्यार्थ्यांच्या सर्व रास्त मागण्या मान्य कराव्यात, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थी संघटना असून ही संघटना शांतता शिस्त नियमांचे पालन करून आंदोलने करीत असतात. मात्र या घटनेमध्ये कायद्याचे रक्षकच राक्षसाच्या भूमिकेत दिसून आलेत, लोकशाही मार्गाने निवेदन देण्याचा प्रयत्न करत असलेल्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करून सदरच्या पोलिसांनी गुंडगिरी केली आहे, केलेली ही क्रूरता अतिशय निंदनीय असून या घटनेतील समाविष्ट सर्व पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात यावे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय खर्च देखील त्यांच्याकडून वसूल करण्यात यावा, आणि ज्यांच्या समोर ही घटना घडली मात्र त्यांनी कोणतीही मध्यस्थी न करता मारहाणीचे अघोषित समर्थन केले असे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी माहितीच्या आधारे आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करणे सेनेने केली आहे.
शासनाने सदर निवेदनाची गंभीर दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करावी करण्याच्या मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे
यावेळी सोशल मीडिया उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य महेंद्र सिंह राजपूत, युवा करणी सेना तालुका अध्यक्ष भावेश राजपूत, युवा करणे सेना वरिष्ठ उपाध्यक्ष आकाश राजपूत, युवा करणी सेना उपाध्यक्ष तेजस राजपूत, मांजरोड शाखेचे अध्यक्ष महेंद्र राजपूत,शिरपुर तालुका वरिष्ठ उप अध्यक्ष,
वीरपाल राजपूत शिरपुर तालुका मीडिया प्रभारी ,विशाल राजपूत वरिष्ठ सह मंत्री,शक्तिराज राजपूत, ऋषिकेश राजपूत, श्रीकांत राजपूत, भुषण राजपूत, रणवीर राजपूत, जयदीप राजपूत, कल्पेश राजपूत, वैभव राजपूत, उमेश राजपूत,कुणाल राजपूत, गौरव राजपूत ,करणी सेनेचे युवा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते,
Tags
news

