विद्यार्थ्यांना मारहाण शिरपुरात मनसे चा निषेध व निवेदन



शिरपूर - दि.२८ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने  मा.श्री तहसिलदार साहेबांना निवेदन देन्यात आले शिरपूर आमची मनसे पक्ष हा पोलीस प्रशासन व पोलीस बाधवाचा नितांत आदर करतो , या घटनेमुळे  आंदोलन का विद्यार्थांना मारहाण प्रकरणी पूर्ण चौकशी होवून दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे , ही मनसेची मागणी महोदय , दि .२६ ऑगस्ट रोजी धुळ्याचे पालकमंत्री साहेब हे धुळे दौऱ्यावर आले असताना काही विद्यार्थ्यांनी त्यांना निवेदन देण्यामाठी थांबविले त्याची भेट न झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रश्नासाठी त्यानी आन्दोलन केले असता पोलीसांनी त्यांना बाजुला करणे .त्यांना ताब्यात घेणे हे अपेक्षित असताना पोलीसांतील काही अधिकाऱ्यांनी सर्व सामान्य विद्यार्थ्यांना लाथा बुक्यानी तोंडावर , अंगावर मारले . ही घटना अंत्यत निषेधार्य आहे . आम्ही या घटनेचा निषेध नोंदवितो . या घटनेचे अनेक चलचित्र हे समाज व प्रसार माध्यामांवरही आले , त्यामुळे धुळे शहराच्या प्रतिमेवर या घटनेचा प्रतिकुल परिणाम झालेला आहे . भारत हा लोकशाही देश आहे . आपल्या देशाच्या सर्वव्यापक घटनेने प्रत्येक व्यक्तीला आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे . असे आंदोलन करत विद्यार्थ्यांच्या समस्या मंत्र्यांच्या दरबारी मांडणे हा विद्यार्थ्यांचा हक्क व अधिकार आहे . मात्र हे आंदोलन करत असताना पोलीसांनी त्यांना अमानुषपणे मारहाण करणे हे कोणत्या कायद्यावर आधारीत आहे ? शिक्षा देणे हा अधिकार मेहरबान न्याय व्यवस्थेचा आहे . तर पोलीसांनी कायदा का हातात घेतला असावा ? ते विदयार्थी हक्कासाठी आंदोलन करत होते ते काही देशद्रोही अथवा कायम स्वरुपाचे गुन्हेगार नव्हते . जर पोलीस हे गुन्हेगाराना रोडवर अशी अमानुषपणे मारहाण करीत नाही , तर प्रसार माध्यमांसमोर सामान्य विद्यार्थ्यांना मारहाण करुन काय संदेश दयावयाचा होता . पालक मंत्री हे जिल्हयाचे पालक असतात , विद्यार्थी व शेतकरी सर्व घटकांच ते नैतिकतेने पालक असतात , तरी विद्यार्थी अमानुष मारहाण होताना पाहुन ते शांत का होते ? महाविकास आघाडी सरकारला यातुन काय संदेश द्यायावयाचा आहे . असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे . संपूर्ण पोलीस प्रशासनावर आरोपी घेवू नये , या घटनेचा अमानुष वागणुकीला , बेकायदेशीर कृत्याला लगाम म्हणुन संबंधीत घटनेची चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे . म्हणून सदर घटनेचे चौकशी आठ दिवसांत करण्यात यावी , अन्यथा मनसे तर्फे तीव्र आदोलन करण्यात येईल . या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष  पुनमचंद आनंदा मोरे ,मनविसे शिरपुर ता.संघटक कैलास बाबर, मनविसे शिरपुर शहर अध्यक्ष सोनु राजपुत , मनसे शहर उपाध्यक्ष मुकेश माळी , मनविसे शहर उपाध्यक्ष राज भोई , रमेश भिल , ज्ञानेश्वर भिल , अजय राजपुत , रामेश्वर भिल , प्रथमेश चौधरी व अदी उपस्थित होते

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने