शिरपूर प्रतिनिधी - 26 रोजी धुळे येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी निवेदन सादर करण्यासाठी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेण्याचे प्रयत्न केले असता ती भेट नाकारण्यात आली त्यामुळे गाडी अडवून निवेदन देण्याच्या प्रयत्न केला असता बंदोबस्तात पथकाने विद्यार्थ्यांवर अमानुषपणे मारहाण केली आहे. या घटनेच्या विध्यार्थी परिषद शिरपूर शाखेकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे . याबाबत संघटनेने तहसीलदार शिरपूर यांना निवेदन सादर केले असून सदरच्या निवेदनात तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे ज्या पालकमंत्र्यांच्या समोर हे मारहाण करण्यात आली त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधून बघ्याची भूमिका घेत या घटनेला अघोषित समर्थन दिले म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
कोरोनाच्या संकटात विद्यार्थी हिताचे कोणतेही निर्णय घेतले जात नाहीत काही मंत्री माननीय पंतप्रधानांना पत्र लिहून विध्यार्थी हिताचे ढोंग करतात प्रत्यक्षात मात्र विद्यार्थ्यांच्या निवेदन स्वीकारण्यासाठी त्यांना वेळ नाही या सर्व बाबी विद्यार्थी हिताच्या विरोधात असून लोकशाहीच्या गळा घोटणारी आहेत.
विद्यार्थ्यांचे 30 टक्के शुल्क माफ करावे प्रधान करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यास संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्यात यावी आणि असंवेदनशील पालकमंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारे आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशा मागण्या केल्या आहेत. सदरच्या मागण्या मान्य न झाल्यास उद्या ती परिषदेकडून राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी सिनेट सदस्य विवेक लोहार, जिल्हा सहसंयोजक नयन माळी, जिल्हा समिती सदस्य पवन राजपूत, जयेस शहा ,विकी राजपूत ,हरिओम धाकड , सागर पाटील, दीपक बेद्रे स्वराज लोहार , पृथ्वीराज लोहार ,जनार्दन पवार इ.कार्यकर्ते उपस्थित होते
Tags
news
