तळोदा प्रतिनिधी - भाजप जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी ,खा.डॉक्टर हिना ताई गावित आ. राजेश पाडवी ,डॉक्टर शशिकांत वाणी, भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बुधाभाई पाटील अनेक ज्येष्ठ सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण सिंह राजपूत यांची भाजप किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस पदी नुकतीच निवड जाहीर करण्यात आली आहे ग्रामीण भागातील शेतकरी जनतेच्या न्याय हक्कासाठी भाजप किसान समितीच्या माध्यमातून जिल्हाभरात ते काम करत आहेत त्यांचे कामसंघटनेच्या राष्ट्रीय पातळीवर पोहोचले त्याची दखल घेत जिल्हा स्तरावरून त्यांची ही निवड करण्यात आली आहे .याबाबत तळोदा नगराध्यक्ष अजय परदेशी, भाजपा माजी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र राजपूत, तळोदा तालुका अध्यक्ष विलास डांमरे ,तसेच तालुक्यातील भाजपाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे
Tags
news
