ब्रेकिंग न्युज अंतिम वर्षाच्या परिक्षेशिवाय विद्यार्थ्याना पास करता येणार नाही - न्यायालयाने दिला मोठा निकाल




 ,मुंबई वृत्तसंस्था - आज अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्यायच्या की नाही यावर न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे, आणि यामध्ये न्यायालयाने परीक्षा घेतल्या जाणारच हे स्पष्ट केले आहे, परीक्षेशिवाय विद्यार्थ्याना पास करता येणार नाही, परीक्षा आत्ता घेणे जरी शक्य नसलं तरी पुढे ढकलता येऊ शकतात असं न्यायालयाने स्पष्ट केले आहे, यूजीसीनं परिक्षा घेण्यासाठी जारी केलेलं पत्रक योग्य असल्याचंही सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. राज्यांनी परीक्षा कधी घ्यावी या बाबत राज्य निर्णय घेऊ शकतात. या मुळे विध्यार्थी मित्रांनो चला अभ्यास करा कारण आता परीक्षा होणारच आहेत. निर्णयचा कायदेशीर अभ्यास करून राज्य या बाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. मात्र परीक्षा होणार की नाही हा संभ्रम आता दूर झाला असून विध्यार्थी आता परीक्षेची तयारी करावीअसे या मुळे स्पस्ट झाले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने