एका घरी डाव फसल्या नंतर दुसऱ्या घरी घरफोडी करून जबरी चोरी




नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे यांजकडून .
नाशिक -:येवला तालुक्यातील बोकटे येथे पहाटेच्या सुमारास विलास संजय दाभाडे यांच्या राहत्या घराच्या शेजारच्या खोलीचे कुलूप तोडून सुटकेस मधील सामान उचकल्या नंतर काहीही न सापडल्याने दुसऱ्या ठिकाणी रात्रीच्याच वेळी वसंत बाबुराव दाभाडे,वय ५५ रा.बोकटे हे त्यांच्या घरात मुलगा व मुलगी आणि पत्नीसह झोपेत असतांना पहाटे ३ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी पाळीव कुत्र्याना हुलकावणी देत घराच्या मागच्या बाजूला दक्षिण दिशेला सिमेंटची चौकट असलेला किचनचा दरवाजा तोडून किचन मध्ये असलेले भांडे, रॅक उचकून डब्याचे झाकने उघडून वसंत दाभाडे यांच्या पत्नीने डब्यात मौल्यवान दागिने त्यात साडेतीन तोळ्यांची पोत, दोन तोळे १ दाणी सर, ३ग्रॅम डोरले, ५ ग्रॅम कानातले झुबे, ५ ग्रॅम पेंडल असे एकूण ६.८ ग्रॅम सोने आणि २/३ हजार रुपये रोख रक्कम चोरांनी लंपास केले असुन, सकाळी उठल्यावर सर्व प्रकार घडल झाल्या नंतर बोकटे येथील पोलीस पाटील यांनी येवला ग्रामीणपोलिसांना सदर घटनेची माहिती दिल्या नंतर येवला ग्रामीण पीआय अनिल भवारी,एपीआय रजपूत एएसआय तांदाळकर,पोलिस कॉ.पगार आदी.घटनास्थळी दाखल झाले व पुढील तपास सुरू केला.व अज्ञात चोरट्यांच्या विरोधात येवला ग्रामीण पोलीस ठाणे येथे कलम-४५७/३८० या  प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने