महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवणार्या जुलमी कर्नाटक सरकारचा शिरपूर शिवसेना तर्फे जाहीर निषेध





शिरपूर - कर्नाटक मधील बेळगाव जिल्ह्यातील मनगुटी या मराठी भाषिक असलेल्या गावातील छ.शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा एडीयुरप्पा मुख्यमंत्री असलेल्या कर्नाटक सरकार ने मध्यरात्री हटवला.मराठी माणसाच्या व समस्त शिवप्रेमी असलेल्या नागरिकांच्या भावना या सरकारने दुखावल्या आहेत.छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान यांनी केला आहे.यावरच न थांबता ह्या जुलमी सरकारने शालेय पाठ्यपुस्तकात असलेला महाराजांवरील धडा सुद्धा ह्या सरकारने काढून टाकला आहे.समस्त महाराष्ट्र व समस्त शिवप्रेमी नागरिकांचा हा अपमान आहे. मते मागण्यासाठी व सरकार स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर करायचा व नंतर त्याचा अपमान करायचा या भाजप नितिचा ह्या कर्नाटक सरकारचा निषेध म्हणून आज दि. ०९ /०८/२०२० रोजी शिरपूर तालुका व शहर शिवसेना, युवासेना, वाहतूक सेना व शिवसैनिकांच्या उपस्थित एडीयुरप्पा सरकारचा कर्नाटक सरकारचा विरोधात घोषणाबाजी करत विजयस्तंभा जवळ पुतळा दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला. 
या प्रसंगी शिवसेना तालुका  प्रमुख भरतसिंग राजपुत, कामगार सेनेचे राजु टेलर , तालुका संघटक मुकेश शेवाळे, वाहतूक सेनेचे अनिकेत बोरसे, युवासेनेचे सचिन सिरसाठ,गोल्डी पाटील, उपतालुकाप्रमुख योगेश सुर्यवंशी, अत्तरसिंग पावरा, दिनेश गुरव, सचिन चौधरी,ओम मराठे,सिध्येष राजपुत,गोलु पाटील, दर्शन अहिरे, हितेश पाटील, गौतम मोरे, तुषार राजपुत,भावेश जैन, निखिल बारि,  सह गावातील असंख्य शिवसैनिक, व शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने