आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी स्वच्छतेला प्राधान्य द्या - जि.प.अध्यक्ष डाॅ.तुषारभाऊ रंधे करोना विषाणूच्या प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आयुष वटी,विटामिन-सी चे अर्थे बु,अर्थे खु व विखरण गावात वाटप






 शिरपूर - सध्या जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत आहे.पण वैद्यकीय विभागाने सांगितलेल्या सुचनांचे पालन केले तर कोरोनाला हरविणे सहज शक्य आहे.यासाठी मास्क वापरणे,हात वारंवार धुणे,समुहात जाणे टाळणे,फिजीकल डीस्टन्सिगचे पालन करणे इ.उपाय करायला हवेत. प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी आयुष वटी व विटामिन सी च्या गोळ्यांचे सेवन करणे आवश्यक आहे.तसेच बोराडी येथील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन व कर्मवीर व्यं.ता.रणधीर आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या  संयुक्त विद्येमानाने  आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार आयुष वटीचे सुमारे दोन लाख गोळ्या बनविण्याचे उद्दिष्ट असुन तालुक्यातील गावांमध्ये वाटप करण्यात येणार आहे. आज  अर्थे बु,अर्थे खु व विखरण गावात पन्नास हजार आयुष वटी व तीस हजार विटामिन सी च्या गोळ्या घरोघरी प्रत्येक कुटुंबाना  मोफत वाटपाची सुरुवात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ना डाॅ.तुषारभाऊ रंधे यांनी केले.
         यावेळी तहसीलदार आबासाहेब महाजन,वैद्यकीय अधिकारी डाॅ.प्रताप पवार  पंचायत समिती सदस्य गावाचे सरपंच तसेच वरिष्ठ ग्रामस्थ, आशासेविका,विखरण आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.
        प्रास्ताविकात प्राचार्य पी एच पाटील यांनी सांगितले की,आयुष वटी ही प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी अतिशय उपयुक्त असुन कन्टेनमेंट झोनमधील डायबेटिस व इतर विकार असलेले व इतर सर्वसामान्य नागरिकांसाठी सुद्धा या गोळ्या उपयुक्त आहेत.तसेच आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार आयुर्वेदिक उपचार देखील रुग्णांवर करण्यास सांगण्यात आले आहे. त्या आधारे शिरपूर तालुक्यातील शिंगावे येथील कोवीड विलगीकरण कक्षातील रूग्णांना आयुष काढा देण्यात येत आहे.दिवसांतून दोन वेळा हा आयुष काढा शिंगावे विलगीकरण कक्षातील रुग्णांना देण्यात येतो.या काढ्यामुळे येथील रुग्णांमध्ये निश्चितच आरोग्यबाबत सुधारना होतांना दिसत असल्याचे सांगण्यात आले.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ना डॉ  तुषारभाऊ रंधे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या  बोराडी येथील इन्स्टिट्यूट आँफ फार्मास्युटीकल एज्युकेशन व कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर आयुर्वेदिक महाविद्यालय येथील संस्थेत आयुष काढा व आयुष वटी बनवण्यात येत असुन तो रुग्णांपर्यंत पाठवण्यात येत आहे.कोवीड सेंटरसह  पोलीस स्टेशन व तालुक्यातील काही गावांपर्यंत हा आयुष्य काढा देण्यात येत आहे.
     आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली व   जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ना  डॉ. तुषारभाऊ रंधे यांच्या  संकल्पनेतून जिल्ह्यातील नागरिकांना मोफत आयुष वटी व विटामिन सी गोळी मिळावी म्हणून बोराडी येथील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन व कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर आयुर्वेद महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आल्या आहेत.व सामाजिक बांधिलकी म्हणून परिसरातील नागरिकांना मोफत वाटप करण्यात येत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने