नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे यांजकडून. नाशिक-:राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण भागातील खेडोपाडी रान वस्ती घरोघर व दारोदार जाऊन आरोग्यसेवा पोचवण्याचे काम गावातील आशा स्वयंसेविका या महिला भगिनी करत असून त्याच खऱ्या कोविंड योद्धा असल्याचे मत स्वारिपचे शशिकांत जगताप यांनी व्यक्त केले
आशा स्वयंसेविका व आशा गटप्रवर्तक गेल्या मागील पंधरा वर्षापासून गावातील नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी मिळणारे तुटपुंजे मानधन व फुटकळ मोबदला यात समाधान मानून आपल्या कर्तव्याशी कर्तव्यनिष्ठ राहून
लहान बालक ,कुपोषित बालक गरोदर माता, वयोवृद्ध यांना आरोग्य सेवा देण्यासाठी रात्रीचा दिवस आशा स्वयंसेविका करत असल्याचे शशिकांत जगताप यांनी पत्रकात नमूद केले आहे
संपूर्ण महाराष्ट्रात मांगील तीन महिन्यापासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली असून गावातून स्थलांतरीत व गावात मुक्कामी येणाऱ्या लोकांची माहिती घेऊन वरिष्ठांना देणं या कामाबरोबरच कोरोना बाधित रुग्णांची हातावर काॅरटाईन शीक्के मारणे, कुठल्याही प्रकारची अॅप्रोल, एच वन मास्क इतर काही सामग्री आरोग्य विभागाकडून उपलब्ध करून दिली नसताना या आशा स्वयंसेविका महिला आपला जीव धोक्यात घालून व मुठीत घेऊन गाव कोरोना मुक्त ठेवण्यासाठी रात्रंदिवस लढा देत असल्याचे चित्र गावात दिसून येत आहे म्हणून च आजपर्यंत शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या फारच कमी आसून इतरही संसर्गजन्य साथीचा आजाराचा शिरकाव व फैलाव गावात होऊ नये म्हणून देखिल स्वचछतेसंबंधी जनजागृती करून स्वतः खबरदारी घेतली जाते म्हणून शासनाने आशा महिलांना खऱ्या अर्थाने गौरविण्यात यावे .आशा स्वयंसेविका व आशा गतप्रवर्तक यांची कार्य सेवा कौतुकास्पद असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते शशिकांत जगताप यांनी प्रसिद्धीपञकाद्वारे
व्यक्त केले आहे
Tags
news
