कृषिदूताकडून शेतकऱ्यांना खत गुणवत्ते संदर्भात मार्गदर्शन




शहादा (प्रतिनिधी) :- के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालय शहादाच्या रूरल अँग्रीकल्चर वर्क एक्सपेरियन्स (रावे या उपक्रमाअतर्गत) जावदे तर्फे हवेली (ता.शहादा) या गावात गौरव सिसोदिया या विद्यार्थ्याने गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन त्यांना कृषी क्षेत्रातील विविध उपलब्ध खतांची गुणवत्ता संदर्भात माहिती दिली त्याचसोबत खतांच्या उपयोग कसा करावा. किती प्रमाणात करावा , त्याचे फायदे कोण-कोणते आहेत याबाबत सविस्तर माहिती स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिली. खेडेगावातील शेतकऱ्यांना या कृषिदूताच्या अभ्यासाचा फायदा होणार.
               के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या गौरव सिसोदिया या विद्यार्थाने तालुक्यातील जावदे तर्फे हवेली येथील शेतकऱ्यांना माहिती दिली व प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले व त्याबाबत संपूर्ण माहिती दिली. त्याचबरोबर सिसोदिया यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्या व प्रश्नांचे निरसन देखील केले. यामुळे शेतकरी बांधव समाधानी झालेत व या खत गुणवत्ते संदर्भात मार्गदर्शन महत्वाचे आहे. असे त्यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले. सिसोदिया यांचे याबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पाटील, प्रा. चंद्रशेखर पाटील व प्रोग्राम अधिकारी प्रा. मुकेश कोळी यांनी अभिनंदन केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने