नंदुरबार :- जयस महाराष्ट्र मार्फत आज DBT योजना अभ्यासगटाचे अध्यक्ष मा. श्री पद्माकर वळवी यांनी भेट घेऊन भोजन DBT मुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, सामाजिक तसेच मानसिक नुकसान व भोजन DBT धोरणमुळे उध्दभोवलेल्या सुरक्षिततेच्या मुद्यांवर सखोल चर्चा करण्यात आली तसेच आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली, व भोजन DBT धोरण पूर्णपणे बंद करून शासकीय खानावळ ची मागणी करण्यात आली व या सर्व वसतिगृह व आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनच्या समष्या चे निराकरण करण्यासाठी आदिवासी विद्यार्थी सहायता कक्ष स्थापन करून भविष्यात उद्धभवना-या समष्या व तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यात यावे म्हणून 'विद्यार्थी सहायता कक्ष' स्थापन करण्याची मागणी जयस द्वारे निवेदनामार्फत करण्यात आली.
महाराष्ट्र जयस मार्फत आज अभ्यासगटाचे अध्यक्ष पद्माकर वळवी यांना निवेदने देण्यात आली.
1 ) भोजन DBT पूर्ण पणे बंद करून शासकीय खानावळ सुरू करण्यात यावे म्हणून..
2) आदिवासी विकास विभागा मार्फत "विद्यार्थी सहायता कक्ष" स्थापन करण्यात यावे म्हणून..
3) दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचे नाव बदलून "वीर एकलव्य स्वयंम योजना" करण्यात यावे व वस्तू व स्ठेशनरी DBT ची रक्कम वाढवण्यात यावी म्हणून निवेदने देण्यात आली .
निवेदन देते वेळी महाराष्ट्र जयस चे पदाधिकारी व नंदुरबार जयस, पिंपळनेर जयस, शिरपुर जयस, नासिक जयस, हिंगोली जयस, अहमदनगर जयस, अकोले जयस, पुणे जयस, धुळे जयस टीम उपस्थित होती.
Tags
news
