शहादा कामगार कल्याण केंद्राच्या वतीने बांधकाम मजूरांना मास्क वाटप




शहादा (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्र, शहादाच्या वतीने इमारत व इतर बांधकाम कामगारांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वाटप करण्यात आले. यावेळी शेख वाहिद शेख सत्तार, बिल्डिंग काँट्रॅकटर मोइनोद्दीन शेख सिराजोद्दीन (काँट्रॅकट्टर) अभिजीत पेंढारकर, सहाय्यक केंद्र संचालक शहादा, रवींद्र गुमाने,( केंद्र सेवक शहादा ) यांच्या हस्ते कामगारांना मास्क वाटप करण्यात आले. हे मास्क कामगार कल्याण  केंद्र शहादा येथील श्रीमती. रुपाली थोरात, शिशु मंदिर आया यांनी तयार केले होते. या उपक्रमासाठी कामगार कल्याण अधिकारी कुंदन खेडकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने