नाशिक -पंचवटीतील रामकुंड परिसरात मंदिरे उघडण्यासाठी घंटानाद आंदोलन ,

       


  

नाशिक  जिल्हा प्रतिनिधी  शांताराम दुनबळे यांजकडून .
नाशिक - राज्यभरातील मंदिरे उघडण्यासाठी भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी मंदिरे उघडण्यासाठी शहर व परिसरात जोरदार आंदोलन केले.रामकुंड येथील कपालेश्वर मंदिराबाहेर घंटानाद करुन मंदिराचे दरवाजे उघडा अशी मागणी केली.
महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळे राज्य सरकारने सर्व नियमांचे बंधन घालून सुरू करावे. गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे, गुरुद्वारा, बुद्ध विहार, जैन मंदिर त्वरित सुरू करावी.
राज्य सरकारने ज्या तत्परतेने मदिरा सुरू केली तशी तत्परता धार्मिक स्थळे सुरू करण्यासाठी दाखवावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी नाशिक महानगराचा वतीने आज रामकुंड आणि कपालेश्वर मंदिर येथे घंटानाद  करून सरकारचे लक्ष वेधण्यात आले. या प्रसंगी आ.राहुल ढिकले,आ.देवयानी फरांदे,शहराध्यक्ष गिरीश पालवे, सुनील बागुल,तुषार भोसले, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल,महंत सुधीरदास पुजारी ,उल्हास धनवटे,सुनील केदार,अविनाश दीक्षित, रामसिंग बावरी,वैभव क्षेमकल्यानी ,जय मोजवती सहभागी झाले होते

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने