प्रख्यात गायक अभिजित कोसंबी यांनी गायले अहिराणी गीत...




-श्रावण महिन्यात खान्देशातविविध उत्सव सुरू होत असतात. यावेळी पारंपरिक लोकगीतां बरोबरच नवनवीन गीतांचे रेकॉर्डिंग सुरू होते. आता स्वातंत्र्य दिवस जवळ आला आहे म्हणून देश भक्तीपर गीतांचे देखील रेकॉर्डिंग होत आहे. ही सर्व गीते रेकॉर्ड करण्यासाठी खान्देशातील कलाकार नाशिकला येतात. सध्या नाशिकच्या बहुतांश स्टुडिओमध्ये अहिराणी गीतांच्या रेकॉर्डिंगला सुरुवात झाली आहे. दिवाळीपर्यंत विविध गाण्यांचं रेकॉर्डिंग सुरू राहील, असे ध्वनिमुद्रण करणाऱ्यांचे म्हणणे आहे . उत्तर महाराष्ट्रात अहिराणी भाषा बोलणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार भागात श्रावण महिन्यात विविध व्रतवैकल्यांना सुरुवात होते. खान्देशात या काळात पारंपरिक गीतांबरोबरच विविध गीते रचली जातात. त्याला संगीतबद्ध करून ती ध्वनिमुद्रित केली जातात. अशाच काही गीतांचे रेकॉर्डिंग पाथर्डी ब्रह्मनाद रेकॉर्डिंग स्टुडिओ प्रस्तुत व गोकुळ पाटील निर्मित, खान्देशच्या अहिराणी बोलीभाषेत अहिराणी देशभक्तीपर गीत मना देश नी बात शे न्यारी तयार केले असुन ते गीत येत्या 14 तारखेला स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन यु ट्युब वर प्रसारीत करण्यात येणार आहे. ह्या गाण्याला महाराष्ट्राचा पहिला महागायक अभिजीत कोसंबी आणि खान्देशमधील प्रसिद्ध गायिका मीना रणदिवे/पाटील ह्यांचे स्वर लाभले असून शब्दरचना खान्देश कवी भूषण गवळे सारंगखेडा ह्यांची असून संगीतबद्ध कन्हैया खैरनार ह्यांनी केले आहे. संपूर्ण गाण्याचे रिदम ऍरेंजमेंट प्रख्यात वादक अभिजीत शर्मा यांनी केले आहे. त्यांना कमलेश शिंदे, देवाशीष पाटील,शुभम जाधव ह्यांची साथ लाभली असुन मनोज गुरव ह्यांनी बासरी वादन केले आहे. गाण्याचे ध्वनिमुद्रण नाशिक येथील ब्रम्हनाद स्टुडिओ येथे रेकॉर्डिस्ट अभिषेक दांडेकर आणि आदित्य नेरे ह्यांनी पूर्ण केले असुन व्हिडिओ रोहित खुळे ह्यांनी केला आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने