ग्रामीण युवकांनी ठरवल्यास 'गाव तेथे वाचनालय'स्थापन करणे अशक्य नाही- प्रवीण महाजन -राष्ट्रीय ग्रंथपाल दिन व 'आंतरराष्ट्रीय युवक दिनानिमित्ताने प्रवीण महाजन यांचे प्रतिपादन-



-महाराष्ट्र राज्यात सत्तावीस हजार पेक्षा अधिक खेडेगावे आहेत.त्यामध्ये बारा हजार शासनमान्य वाचनालये असून निम्म्यापेक्षा अधिक गावामध्ये वाचनालये नाहित. शिवाय नवीन स्थापन होणाऱ्या वाचनालयांना शासन मान्यता देत नाही.परिणामी ग्रामीण भागातील जनतेपर्यंत शासनाच्या अनेक योजनांची माहीती पोहचत नाही.अनेक स्पर्धा  परीक्षाचा अभ्यास करण्यासाठी गावामध्ये स्पर्धा परीक्षा वाचनालये उपलब्ध नाहीत त्यामुळे वाचन चळवळ थांबली आहे.युवकांनी एकत्र येत   लोकसहभागातून वाचनालये स्थापन केल्यास नक्कीच वाचन चळवळ वृद्धिंगत होण्यास मदत होईल असे प्रतिपादन पुणे येथील वाचन चळवळ व युवकमित्र परिवाराचे  कार्यकर्त प्रवीण महाजन यांनी केले.
       यावेळी ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस.आर.रंगनाथन यांना ऑनलाइन अभिवादन करण्यात आले.यावेळी जाणीव सामाजिक संस्थेचे चेतन मराठे, सागर पाटील उपस्थित होते. गेल्या पाच वर्षात पुणे व मुंबई येथील जुनी/नवी पुस्तके गोळा करून तब्बल दोनशे बावीस शाळांमध्ये व बावीस गावामध्ये वाचनालये स्थापन केले असल्याचे महाजन यांनी सांगितले.आज या वाचनालयाचा लाभ तब्बल एक लाख विद्यार्थी घेत आहेत. केवळ आम्ही युवकांनी एकत्र येत,सकारात्मक दृष्टीकोनातून हे काम उभारले असून प्रत्येक गावातील युवकांनी ठरवल्यास गावात वाचनालय स्थापन करणे शक्य नाही.असेही ते म्हणाले.ग्रामीण भागातील तालुक्याची ठिकाणे,जिल्हा मध्यवर्ती ठिकाणे,महाविद्यालयामध्ये वर्षातून किमान एक दिवस जुने पुस्तक संकलन मोहीम राबविल्यास असंख्य ग्रंथ प्राप्त होतात.व हेच ग्रंथ वाचनालयात वाचकासाठी उपलब्ध करून दिल्यास खूप मोठा उद्देश साध्य केला जातो.त्यामुळे जास्तीत जास्त ग्रंथ संकलन कॅम्प राबवावेत असेही महाजन यांनी स्पष्ट केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने